- आरोग्य

दुधामध्ये खजूर मिसळून खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

दूध आणि खजुराचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, लोह आणि कॅल्शियम यासारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. थंडीच्या दिवसात दुधामध्ये खजूर मिसळून खाण्याचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.

सर्वप्रथम 4 ते 6 खजूर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. दुध गरम करून घ्या. काहीवेळ थंड होऊ द्या. त्यानंतर त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेले खजूर मिसळा. सकाळी सकाळी नाश्त्यासोबत हे प्या. 

नियमित दुधामध्ये खजूर मिसळून प्यायल्याने हाडांची झालेली झीज भरून येते. त्याबरोबरच सांधेदुखी चा त्रास कमी होण्यास मदत मिळते. खजूर आणि दुधामध्ये कॅल्शिअमचं भरपूर प्रमाण असतं. त्यामुळे लहान मुलांच्या हाडांचा विकास चांगला होतो.

दुधामध्ये खजूर मिसळून प्यायल्याने आपली पाचनशक्ती सुधारण्यास मदत मिळते. नियमित दुधामध्ये खजूर मिसळून प्यायल्याने चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येत नाही. आपण वजन वाढवण्याचा विचार करत असल्यास नियमित दिवसातून 2 वेळा दुधामध्ये खजूर मिसळून प्या. काही दिवसात आपल्याला फरक जाणवेल.

गरोदर स्त्रियांनी दुधामध्ये खजूर मिसळून प्यायल्याने विशेष लाभ होतो. खजूरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम असे शरीराला आवश्यक घटक असल्याने त्याचा लाभ गर्भाला होतो. त्याचे स्नायू बळकट होण्यास मदत होते.

नियमित दुधामध्ये खजूर मिसळून प्यायल्याने आपल्या त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स कमी होतात. नियमित दुधामध्ये खजूर मिसळून प्यायल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते तसेच तुम्हाला रातांधळेपणा, रंगांधळेपणा अशा समस्या निर्माण होणार नाही.

नियमित दुधामध्ये खजूर मिसळून प्यायल्याने आपले केस मजबूत होतात. हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास आपण नियमित दुधामध्ये खजूर मिसळून प्यायल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळेल. नियमित दुधामध्ये खजूर मिसळून प्यायल्याने त्वचा लवचिक होण्यास मदत मिळते.

आपल्याला दुधामध्ये खजूर मिसळून खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: फूड एन डी टी व्ही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *