- आरोग्य

नाकावरील ब्लॅकहेड्स कमी करण्याचे घरगुती उपाय

बदलत्या हवामानाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. शहरातील प्रदूषित हवामान, धूळ यामुळे आपल्या चेहऱ्यावर विशेषता नाकावर ब्लॅकहेड्स वाढतात. ब्लॅकहेड्स म्हणजे त्वचेवर येणारे छोटी छोटी छिद्र असतात जी आपल्या त्वचेवर असणारे हेअर फॉलिकल्स बंद झाल्यामुळे दिसतात.

ही नाक, छाती, पाठ, येथे दिसतात. चेहर्यावरील हार्मोन्सच्या बदलामुळे आणि नाका जवळील तेल ग्रंथीमुळे ब्लॅकहेड्स वाढतात. ब्लॅकहेट्स कमी करण्यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची आवश्यकता नाही वारंवार पार्लरमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही या काही घरगुती उपाय आपल्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेट्स कमी करण्यास मदत करतील.

ब्लॅकहेड्स वाढू नये म्हणून स्क्रब करू शकता यासाठी.चमचाभर मध घ्या त्यामध्ये थोडीशी साखर घालून हे मिश्रण नाकावर हळुवार हाताने चोळा. या स्क्रबचा ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी नक्की फायदा होईल.

तुम्ही जर नियमित मेकअप करत असाल तर ब्लॅकहेड्स वाढू शकतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी तुम्ही मेकअप उतरवा. रोमछिद्र बंद राहिल्याने ब्लॅकहेड्सना येण्याला संधी मिळते. म्हणून झोपण्यापूर्वी मेकअप काढा.

तुम्ही जर नियमित व्यायाम करत असाल तर घामा सोबत ब्लॅकहेड्स पण निघून जातील त्यामुळे नियमित व्यायाम करत राहा. त्याने तुमचा चेहरा लखलखीत दिसेल.

काकडीचा रस अथवा काकडीच्या पातीने चेहऱ्यावर काही वेळ मालिश करा. यामुळे ब्लॅकहेड्सचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. काकडी हा सर्वोत्कृष्ट उपाय आहे.

कोरफड हा त्वचेच्या कोणत्याही समस्येवर रामबाण उपाय आहे. कोरफडीचा गर काढून काही वेळासाठी चेहऱ्यावर लावून ठेवा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा. तुमच्या नाकावरील ब्लॅकहेट्स जाण्यास मदत होईल. तसेच तुमचा चेहरा अगदी लख्ख दिसेल.

बेकिंग सोडा एक नैसर्गिक एक्सफोलेटर आहे. बेकिंग सोडा आणि पाणी वापरून पेस्ट तयार करा आणि ब्लॅकहेड आलेल्या भागावर लावा. काही मिनिटे त्वचेला हळुवारपणे बोटानी स्क्रब करा आणि नंतर पाण्याने धुवा. चांगल्या परीणामासाठी आठवड्यातून दोनदा हा उपाय आपण करू शकता.

आपल्याला नाकावरील ब्लॅकहेड्स कमी करण्याचे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: फूड एन डी टी व्ही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *