- आरोग्य

एसिडिटी झाल्यास करा हे प्रभावी घरगुती उपाय

रात्रीचे जागरण, अवेळी जेवण, तणाव, मसालेदार आणि तिखट जेवण करण्याची सवय, अशा कारणांनी आपल्याला एसिडिटीला सामोरे जावे लागते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत एसिडिटी झाल्यास कोणकोणते घरगुती उपाय करता येतील.  

जर आपल्याला एसिडिटी जाणवत असेल तर फक्त 1 ग्लास पाणी कोमट प्या. कोमट पाणी प्यायल्याने आपल्या पोटातील अतिरिक्त एसिड बाहेर काढून टाकण्यास मदत मिळेल. हा उपाय किरकोळ वाटत असला तरीही खूप चांगला परिणाम दाखवतो.

जेव्हा आपल्याला एसिडिटी जाणवत असेल तेव्हा काही तुळशीची पाने तोडून चघळा. असे केल्याने आपल्या पोटात आराम मिळेल. तसेच तुळशीची पाने 1 कप पाण्यात उकळवा आणि त्यात थोडेसे मध मिसळा. थोड्या थोड्या वेळाने हे पाणी प्या आपल्याला लवकर आराम मिळेल.

ताक पिणे हा एसिडिटी दूर करण्याचा हा अगदी सोपा मार्ग आहे. ताकामध्ये लैक्टिक एसिड असते ज्यामुळे पोटातील आम्लता कमी होण्यास मदत मिळते. ताकात थोडीशी मिरपूड पावडर आणि धणे मिसळून दिवसातून 3 / 4 वेळा प्या. असे केल्याने आपली एसिडिटी कमी होईल.

आपल्याला एसिडिटी जाणवत असल्यास आपण कलिंगडाचे ज्यूस प्या. कलिंगडाचे ज्यूस प्यायल्याने पचन व्यवस्थित होते. तसेच एसिडिटी कमी व्हायला मदत मिळेल.

एसिडिटीवर जिरे खूप प्रभावी आहे. जिरे पचनास मदत करते आणि पोटदुखी देखील कमी करते. जिरे यासाठी जिरे भाजून घ्या. आणि मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर हि जिरेपूड 1 ग्लास पाण्यात घालून प्या. थोड्या थोड्या वेळाने हे पाणी प्या आपल्याला लवकर आराम मिळेल.

ज्यांना नेहमी एसिडिटीचा त्रास होतो. त्यांनी जेवण झाल्यानंतर थोडीशी बडीशेप खाण्याची सवय लावा. बडीशेप खाल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते.

जेव्हा आपल्याला एसिडिटी जाणवत असेल तेव्हा 4 / 5 पुदीनाची पाने चघळा. असे केल्याने आपल्याला लवकर आराम मिळेल. पुदिनाची पाने खाल्याने पोटदुखीही कमी होते.

काही पुदीनाची पाने 1 कप पाण्यात उकळवा आणि थंड झाल्यावर थोड्या थोड्या वेळाने हे पाणी प्या. आपल्याला लवकर आराम मिळेल. ज्यांना नेहमी एसिडिटीचा त्रास होतो.

त्यांनी जेवण झाल्यानंतर छोटासा गुळाचा खडा खा. गुळ खाल्याने पाचक प्रणाली चांगले कार्य करते. आणि एसिडिटी मध्ये हि आराम मिळेल. रात्रीचे जेवण हे झोपायच्या दोन तास आधी करा. असे केल्याने आपल्याला एसिडिटीचा त्रास होणार नाही.

आपल्याला एसिडिटी झाल्यास करा सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेअल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *