- आरोग्य

गरम पाण्याची वाफ घेण्याचे आरोग्यदायी फायदे

गरम पाण्याची वाफ घेतल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. थंडी, पाऊस तसेच सध्याच्या को’रो’ना’मु’ळे बाहेरील दूषित वातावरणाचा आपल्या शरीरावर परिणाम होऊन आपण आजारी होण्याच्या शक्यता जास्त आहेत.

परंतु तुम्ही रोज गरम पाण्याचे वाफ घेतले तर तुमच्या आरोग्य चांगले राहील. चेहऱ्यासाठी गरम पाण्याची वाफ घेणे अतिशय फायदेशीर आहे.

वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर गरम पाण्याची वाफ घेणे फायद्याचे ठरते. नाकातोंडातून तसेच घशाला वाफेचा शेक मिळाल्यामुळे लवकर आराम वाटते. वाफेसोबत कोमट पाण्याच्या गुळण्या केल्याने खोकला कमी होतो.

चेहरा तजेलदार दिसावा असे वाटत असेल तर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा गरम पाण्याची वाफ घेऊ शकता. यामुळे तुमचा चेहरा खुलून दिसेल.

कोणताही स्क्रब अथवा चेहऱ्यावर चंदन लावायचे झाल्यास तुम्ही आधी गरम पाण्याची वाफ घ्या. त्यामुळे चेहऱ्यावरील छोटी छोटी छिद्र मोकळी होतात आणि  चेहऱ्यावरील घाण बाहेर निघते.

त्वचेवरील मृत त्वचा गरम पाण्याची वाफ घेतल्यामुळे निघून जाते आणि तुमचा चेहरा तजेलदार दिसतो. गरम पाण्याची वाफ घेणे हे शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

घसा दुखीचा त्रास होत असल्या  गरम पाण्याची वाफ घेणे फायद्याचे ठरते. ज्यावेळेस घसा दुखत असेल  तेव्हा गरम पाणी करून घशाला शेक मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही वाफ घेऊ शकता याने बराच फरक जाणवेल.

आठवड्यातून दोन वेळा वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील रक्ताभिसरण क्रिया चांगल्या पद्धतीने होते. त्वचेखालील पेशींचे रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होऊन त्वचेला ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास मदत होते.

गरम पाण्याची वाफ घ्यायला सुरुवात करण्यापूर्वी थोडेसे पाणी प्या. तसेच आपला चेहरा हि धुऊन घ्या. वाफ घेताना आपले डोळे बंद राहूद्या. वाफ घेतल्यानंतर चेहरा सुती कपड्याने हलक्या हाताने पुसून घ्या. रगडू नका.

आपल्याला गरम पाण्याची वाफ घेण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेअल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *