- आरोग्य

पायांच्या भेगा घालवण्यासाठी घरगुती उपाय

थंडीच्या दिवसात पायांना भेगा पडतात. पायांना भेगा पडल्यास बऱ्याच वेदना सहन कराव्या लागतात. शिवाय पायाचे सौंदर्यही लुप्त होते. पायाला भेगा पडायला लागल्या की त्या भरून येण्यास वेळ लागतो. तसेच या भेगा जर खोलवर गेल्या तर त्यातून रक्त यायला लागते, पायांच्या भेगा कमी करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी हे काही उपाय करू शकता.

पिकलेल्या केळ्यांनी फाटलेल्या टाचांचा इलाज हा सर्वात स्वस्त आणि उपायकारक उपाय आहे. केळ्यामध्ये असणारे मॉयश्चराइजर पायांना कोमल ठेवतात.

भेगा पडलेल्या ठिकाणी रात्री ग्लिसरिन लावून पायमोजे घालून ठेवावेत. सकाळी गार पाण्याने पाय धुवावेत. आंघोळीच्या आधी कोमट पाण्यात व्हिनेगर घालून त्या पाण्यात पाय बुडवून ठेवावेत.

लिंबू पायाला स्वच्छ आणि भेगा भरण्यास मदत करते एक लिंबू कापून तळपायांना घासा हि कृती आठवड्यातून दोन वेळा करा. कोमट पाण्यात एक कप मीठ टाकून त्यामध्ये तळपायाचा भाग भिजू घाला नये सुद्धा फायदा होतो.

गुलाब जल, लिंबू रस आणि ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन हे मिश्रण फाटलेल्या भेगांवर लावा. हे मिश्रण रात्रीचे लावून, पायमोजे घालून झोपा. असे केल्यास थोड्याच दिवसात आपल्या फरक जाणवेल.

तिळाच्या तेलामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते. तिळाचे तेल जखम बरी करण्यासाठी फायदेशीर ठरते. कडूलिंबाचा पाला कुटून, रस काढून पायांना लावल्यास भेगा कमी होतात.

जर पायांना जास्त भेगा पडल्या असतील, तर रात्री झोपण्याआधी पाय स्वच्छ धुवून कोरडे करावेत, व त्यानंतर भेगांना वितळलेले मेण लावावे. मेणामुळे खोल भेगा लवकर भरून येण्यास मदत मिळते.

चंदन उगाळून लेप लावल्यासही भेगा कमी होतात. हळदीमध्ये कोमट तेल टाकून ते मिश्रण भेगांमध्ये भरल्यास भेगा कमी होतात. भेगा पडू नयेत, यासाठी आंघोळ करताना रोज पायांचे तळवे प्युमिक स्टोनने (दगडी घासण) घासावेत.

आठवड्यातून एकदा बदाम आणि तिळाचे तेल समप्रमाणात घेऊन तळव्यांना मालीश करा. काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. पायांना पडणाऱ्या भेगा भरून येण्याकरिता सर्वात उत्तम पर्याय म्हणजे पेट्रोलियम जेली.

हा उपाय करण्याकरिता रात्री झोपण्याआधी पाय स्वच्छ धुवून घेऊन कोरडे करून घ्या आणि त्यानंतर तळ पायाना  पेट्रोलियम जेली लावा. पायांवर कोमट खोबरेल तेलाने मालिश करा. जमल्यास घरात मोजे वापरा.

आपल्याला पायांच्या भेगा घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेअल्थलाईन आणि ब्राईट साईड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *