- आरोग्य

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी घरगुती उपाय

बदलत्या वातावरणामुळे आपल्या शरीरातही बदल होत असतात. अति ताण घेतल्यामुळे, धावपळ केल्यामुळे तसेच वेळेत जेवण न केल्यामुळे आपले ब्लडप्रेशर नियंत्रणात राहत नाही.

आपल्या पैकी काही जणांना ब्लडप्रेशर कमी-जास्त होण्याचा त्रास होत असतो. भारतासारख्या देशात ब्लडप्रेशर वाढण्याचे आणि कमी होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणात जास्त आहे. आज जाणून घेऊयात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी घरगुती उपाय.

रक्तदाब वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या आहारामध्ये मिठाचा वापर मोठ्या प्रमाणात करणे. आपण जर नियमित योग्य तेवढाच  मिठाचा वापर आहारामध्ये केला तर आपले ब्लडप्रेशर नियंत्रणात राहील. त्यामुळे आहारात मिठाचा वापर योग्य प्रमाणात करावा.

आपल्या रोजच्या आहारामध्ये तुम्ही अशा खाद्यपदार्थांचा समावेश करा ज्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असेल. तुम्ही फळांचा समावेश करू शकता. जसे की संत्री, सफरचंद यामुळे आपले ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.

आवळा हा सहज उपलब्ध होणारा घरगुती उपचार आहे. ब्लडप्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी आवळा खाणे किंवा आवळ्याचा रस पिणे हा सोपा उपाय आहे  तुम्ही जर नियमित आवळा खात असाल तर तुमचे ब्लड सर्क्युलेशन योग्य राहते.

जर तुम्हाला हाय ब्लडप्रेशरचा त्रास असेल तर तो आटोक्यात आणण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे लिंबू. यासाठी अर्धा ग्लास पाण्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकून त्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होईल.

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या आहारात बीटाचा समावेश करा. बीटामध्ये नायट्रिक एसिड असते जे रक्तवाहिन्या उघडण्यास आणि दबाव कमी करण्यास मदत करते. तसेच रक्त प्रवाह योग्य प्रकारे राखण्यास मदत करते.

दररोज कमीत कमी 5 ते 8 लिटर इतके पाणी तुमच्या शरीरामध्ये आवश्यक आहे. नियमित पाणी पिल्याने रक्त प्रवाह सुरळीत होतो. रक्तातील अशुद्ध घटक दूर होतात. किडनीचे आरोग्य चांगले राहते. तसेच ब्लडप्रेशर ही नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

ज्यांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनी स्वतःचे वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. वजन वाढल्यामुळे ही रक्तदाब वाढतो. त्यामुळे नियमित व्यायाम चालू ठेवून तुमचे वजन नियंत्रणात  ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्हाला हाय ब्लडप्रेशरचा त्रास असेल तर मांसाहार कमी करा.

आपल्याला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: मेडिकल न्यूज टुडे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *