- आरोग्य

मायग्रेन अर्थात अर्धशिशीवर सोपे घरगुती उपाय

आजकालच्या या धावपळीच्या युगात दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींचा ताण-तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच छोट्या छोट्या काळजी आणि चिंताचे रूपांतर शारीरिक दुखण्यात कधी होते हे माणसाला कळत नाही. छोट्या छोट्या गोष्टींच्या ताण-तणावामुळेच मग सतत डोकेदुखी, मायग्रेन अशा गोष्टी व्हायला लागतात.

मायग्रेन हा चेतासंसंस्थेचा आजार आहे. मायग्रेनचा त्रास सुरू झाला की भूक मंदावते. अंगाला सतत घाम येतो, मळमळ होते, कोणताही आवाज सहन होत नाही अशा गोष्टी होऊ शकतात.

अपुरी झोप, ताण- तणाव या कारणाने हा त्रास होऊ शकतो. या त्रासाकडे दुर्लक्ष केल्याने गंभीर समस्या होऊ शकतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. मायग्रेन अर्थात अर्धशिशीवर सोपे घरगुती उपाय.

मायग्रेन या आजारात तीव्र डोकेदुखी होते. डोक्याचा अर्धा भाग दुखू लागतो. या आजारात असह्य वेदना होऊ लागतात. मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दुधामध्ये अर्धा चमचा पेक्षा थोडी कमी लवंग पावडर मिसळून प्या. असे केल्याने आपल्याला शांत झोप लागेल आणि डोकेदुखी कमी होण्यास मदत मिळेल.

मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी एका सुती कपड्यात बर्फ घेऊन त्याने दुखणाऱ्या भागावर शेकवा. आपल्या कपाळावर, टाळू किंवा मानेवर आईसपॅक ठेवा. असे केल्याने आपल्या वेदना कमी होण्यास मदत मिळेल. बर्फाने शेकवल्याने धमन्या मध्ये आलेली सूज कमी होऊन आपल्याला आराम मिळेल.

तुमचे डोके मायग्रेनमुळे दुखत असेल तर यासाठी रोज सकाळी लवकर उठून रिकाम्या पोटी एक सफरचंद खावे. सफरचंद हे फळ अनेक रोगांवर गुणकारी फळ आहे. सफरचंदच्या सेवनाने मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी आपण आल्याचा चहा पिऊ शकता. आल्याचा चहा पिण्यामुळे मळमळ आणि उलट्या यासारख्या मायग्रेनच्या लक्षणांवर मात करण्यास मदत होते.

मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी दालचीनीची पावडर थोड्याश्या पाण्यामध्ये मिसळून त्याची पेस्ट डोक्याला लावा. त्यामुळे डोकेदुखी कमी होईल. हळूहळू मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी आल्याच्या रसामध्ये चमचाभर मध मिसळून हे मिश्रण पाण्यात घालून प्या. त्यामुळे तीव्र डोकेदुखीचा कमी होईल. आल्याचा चहा घेतल्यास डोकेदुखीमध्ये आराम मिळतो. आल्याचा रस डोकेदुखीवर चांगला उपाय आहे.

अर्धशिशी या आजारापासून सुटका होण्यासाठी योगा करणे उपयुक्त आहे. यासाठी हस्तपदासन, पश्चिमोत्तानासन, पद्मासन, शवासन ही योगासने रोज केल्यास मायग्रेनपासून सुटका होईल. मायग्रेनचा त्रास होऊ नये यासाठी पुढील गोष्टी आपण करू शकता.

दिवसभरात भरपूर पाणी प्या. आपल्या शरीराला व्यवस्थितपणे कार्य करण्यासाठी पाण्याची गरज असते. त्यामुळे दिवसभरात आपण साधारणपणे 3 ते 4 लिटर पाणी पिणे गरजेचे असते.

मायग्रेनचा त्रास कमी व्हावा असे वाटत असेल तर जास्त वेळ उपाशी राहू नका. जेवणाच्या वेळा पाळा. आपल्या आहारात फळे भाजीपाला यांचा समावेश असुद्या.

आहारातील मीठाचे प्रमाण कमी करा. नियमित पुरेशी झोप घ्या. रात्रीचे जागरण करू नका. सकाळच्या वेळी 10 मिनिटे तरी मोकळ्या वातावरणात चालायला जा.

छोट्या छोट्या गोष्टींवरून चीड चीड करणे टाळा. उग्र वासाचे परफ्युम वापरू नका. नियमित मेडीटेशन करा. योगा आणि व्यायामामुळे तुमचे मन शांत राहण्यास मदत होईल. मनपसंत संगीत ऐकत चला.

आपल्याला मायग्रेन अर्थात अर्धशिशीवर सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: फार्म एजी, वेब एम डी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *