- आरोग्य

रोज एक आवळा खाल्याने मिळणारे जबरदस्त आरोग्यवर्धक फायदे

आवळा बाजारात सहज उपलब्ध होणारे फळ आहे. या फळात अनेक गुणधर्म आहेत. आवळ्याला फक्त फळ म्हणून न पाहता त्याकडे औषध म्हणून पाहण्याची गरज आहे. कारण आवळ्यामध्ये असणारे गुणधर्म तुम्हला अनेक आजारापासून दूर ठेवतात.

छोट्याशा आकाराच्या आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटेशियम, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशियम, कारबोहाइड्रेट फायबर यासारखे अनेक उपयोगी घटक असतात. चला तर जाणून घेऊयात गुणकारी आवळ्याचे सेवन केल्याने होणारे फायदे.

डोकं शांत राहणं किंवा केसांच्या सर्व तक्रारींसाठी आवळ्याचं तेल इतर औषधींसह नियमित वापरल्यास फरक पडतो. आवळ्यात भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेन्ट गुणधर्म असतात. केसांची कुठल्याही प्रकारच्या समस्येवर आवळा हा अत्यंत परिणामकारक आहे. आवळा आपल्या केसांना निरोगी ठेवते आणि त्यामुळे आपले केस पांढरे होत नाहीत.

आवळ्यात ‘व्हिटॅमिन सी’ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आवळ्याचे सेवन केल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सकाळी आवळ्याचा ‘मुरांबा’ खाल्ल्यास फायदा होऊ शकतो.

लघवी साफ होत नसल्यास, आम्लपित्त, पोट साफ न होणे अशा अनेक तक्रारींवर आवळा अत्यंत गुणकारी आहे. जीभ जेव्हा कोरडी पडते तेव्हा जीभेची चव नाहीशी होते. त्यामुळे नियमित जिभेवर लाळ ठेवण्यासाठी तुम्ही आवळा खाऊ शकता. आवळ्याचे सेवन केल्याने जीभेला चव येते.

आवळ्यात ‘व्हिटॅमिन सी’ भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा उत्तम औषध आहे. आवळ्याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते.

नियमित आवळा सेवनाने स्मरणशक्ती वाढते. आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.

नियमित आवळा सेवनाने स्मरणशक्ती वाढते. म्हणून आवळ्यापासून तयार केलेला च्यवनप्राश आहारात नियमितपणे घ्यावा. आवळ्याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते.

जर डोकंदुखीचा त्रास होत असेल तर आवळ्याचं चूर्ण, तूप व खडीसाखर समप्रमाणात घेऊन एकत्र करावं. सकाळच्या वेळी उपाशी पोटी हे मिश्रण सेवन केल्याने डोके दुखीचा त्रास नाहीसा होतो. आवळा थोडासा पिकलेला असावा. कच्चे आवळे खाऊ नयेत.

आपल्याला आवळा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: एन डी ती व्ही हेल्थ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *