केसांना सारखा सारखा रंग लावल्याने, स्ट्रेटेनर्स आणि केस ड्रायर यासारख्या उष्णतेच्या उपकरणाचा अती वापर केल्याने केसांचे नुकसान होते आणि त्यातून निघणारी उष्णता केसांना निर्जीव बनवते. या बरोबरच धूळ प्रदूषण यामुळे केस कोरडे आणि निर्जीव बनू लागतात.
याबरोबरच बऱ्याचदा केसांना व्हिटमिन्सचा योग्य पूरवठा होत नाही तेव्हा पोषणाच्या अभावी केस दुभंगतात केसांना फाटे फुटतात. खासकरून महिलांच्या केसांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. केसांना फाटे फुटत असल्यास आपण कोण कोणते घरगुती उपाय शकतो.
सर्वप्रथम जर आपल्या केसांना फाटे फुटले असतील तर केसांची टोके साधारणपणे 1 ते 2 इंचा पर्यंत कापून टाका. असे केल्याने केस भरभर वाढतील आणि केसांना फाटे फुटणार नाही.
कोरफडमध्ये अनेक पोषक तत्त्व असतात. ज्यामुळे केसांना फाटे फुटण्याचं प्रमाण कमी होतं. त्यासाठी आपण कोरफड जेलमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळून घ्या. आता मिश्रणाने केसांना मसाज करा. साधारण ३० मिनिटे हे मिश्रण केसांवर तसेच राहू द्या.
त्यानंतर केस शाम्पूने धुवून टाका. केस कोरडे झाल्यावर केसांना फाटे फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे केस कोरडे होऊ नये यासाठी केसांना कंडिशनर लावा.
केस वारंवार शाम्पू केल्याने केस कोरडे होतात. त्यामुळे केस दुभंगतात. केसांवर वारंवार केमिकलचा वापर केल्याने केसांना फाटे फुटण्याची शक्यता असते.
केसांना फाटे फुटू नये यासाठी केसांना नारळाचं तेल लावून रात्रभर केस टॉवेलमध्ये बांधून ठेवा. दुसऱ्या दिवशी केसांना शॅम्पू आणि कंडिशनरने धुवा. असे केल्याने केसांना पोषण मिळेल.
रात्री थोडेसे मेथी दाणे भिजायला ठेवा. सकाळी ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यामध्ये दही मिसळा. आणि हे मिश्रण केसांवर लावा. 30 मिनिटे राहूद्या त्यानंतर के कोमट पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने केस मऊ होतील.
केसांना फाटे फुटू नये यासाठी एका लहानश्या वाटीमध्ये अंड्याचा बलक घ्या त्यामध्ये 1 चमचा ऑलिव्ह तेल आणि 1 चमचा मध घालून ढवळून घ्या.
आता हे मिश्रण आपल्या केसावर लावा. साधारण 45 मिनिटे राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुऊन टाका. असे केल्याने केस मऊ होतील. आणि केस कोरडे निर्जीव दिसणार नाहीत.
केसांना फाटे फुटू नये यासाठी दररोज साधारणपणे 8 ग्लास पाणी प्या. आपले केस चमकदार राहायला मदत मिळते. आपले केस चमकदार आणि सुंदर दिसण्यासाठी आपल्याला हायड्रेट असणे महत्वाचे आहे.
सारखे सारखे केस धुण्यामुळे बऱ्याचदा केसांची नैसर्गिक चमक कमी होते. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा केस धुवा आणि केसांचे नुकसान टाळण्यासाठी सौम्य शैम्पूचा वापरा.
केसांना फाटे फुटू नये यासाठी आपल्या दैनंदिन आहारामध्ये आपल्या शरीरास आवश्यक असणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे असणाऱ्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा. ज्यामधून तुम्हाला केसांच्या मजबुतीसाठी प्रथिने, लोह, व्हिटॅमिन सी आणि ओमेगा 3 सारखे घटक मिळतील.
आपल्याला केसांना फाटे फुटत असल्यास सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: फूड एन डी टी व्ही आणि फेमिना.