- आरोग्य

सुटलेलं पोट कमी करण्यासाठी १० प्रभावी घरगुती उपाय

आपण सुरुवातीला वजन वाढण्याकडे लक्ष देत नाहीत परंतु जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी घाम गाळत बसाव लागत. या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही  लवकर वजन कमी करू शकता. कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, दालचिनी या पदार्थांमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते.

आहारात मिठाचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा. कारण मिठातील सोडियममुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा वाढतो.

रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्यानं शरीराची पचनक्रिया वाढते. ज्यामुळं आपलं वजन कमी होण्यास मदत होते. आहारात साखरेचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा. साखरेऐवजी गुळ अथवा मधाचा वापर नक्कीच करू शकता.

आहारात नियमितपणे दही असेल तर त्यामुळे सडपातळ होता येईल. पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी कच्च्या लसणाची एक पाकळी खा. लावा यामुळे पोटावर आलेली  चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.

पूर्ण झोप झाली नाही तर वजन वाढतं. झोप चांगली झाली तर पचनक्रिया वाढते आणि अतिरिक्त चरबी वाढत नाही. सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात एक चमचा मध टाकून घेतल्याने आपलं वजन कमी होण्यास मदत होते.

योगा केल्याने वजन घटण्यास मदत होते. पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे. कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि थोडे मिठ मिसळून घ्या. दररोज सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॉलिजम चांगले राहाते आणि सोबतच तुमचे वजन कमी होण्यासही मदत होते.

वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात शक्य तितक्या प्रमाणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्यांमधून आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतील सोबतच आपले वजन हि कमी होण्यास मदत मिळेल.

वजन कमी करायचे असल्यास स्वताला पहाटे पायी चालण्याची सवय लावा यामुळे पोटावर आलेली  चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.

वजन कमी करण्यासाठी जेवण करण्यापूर्वी एक वाटी काकडीचे काप मीठ न लावता खाण्यास विसरू नका. 100 ग्राम काकडीमध्ये  फक्त 16 कॅलरी असतात. म्हणून आपलयाला भूक लागल्यावर एक वाटी काकडी अवश्य खा.

“आपला चयापचय दर चांगला राहण्यासाठी” आणि शरीरात चरबी वाढून द्यायची नसेल तर  आपण दिवसभरात पुरेसे पाणी प्यायले पाहिजे. दिवसाला सहा ते आठ ग्लास पाणी घ्या.

“रात्री उशिरा जेवन केल्याने पोटावरील चरबी वाढते”. त्यामुळे रात्री झोपण्याच्या २ तासाआधी जेवा. रात्रीचं जेवनामध्ये हलका आहार घ्या. तेलकट, मसालेदार जेवण करू नका. झोपण्याआधी शतपावली कण्यास विसरु नका. यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.

आपल्याला पोट कमी करण्यासाठी १० प्रभावी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: फेमिना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *