- आरोग्य

उन्हामुळे नाकातून रक्त आल्यास करा हे घरगुती उपाय

उन्हाळ्याच्या तडाख्यात नाकातून रक्त येण्याची समस्या उद्भवते. ही समस्या वरवर सामान्य वाटत असली तरी यावर उपचार करणे आवश्यक आहे. वातावरणातील उष्णतेमुळे नाकातून रक्त येते. चला तर जाणून घेऊयात नाकातून रक्त येण्यामागील कारणं आणि त्यावरील उपाय.

नाकातून रक्त येतं म्हणजे नेमकं काय होतं असत? नाकाच्या आतल्या बाजूला असलेल्या पातळ त्वचेला ‘म्युकोझा असं म्हणतात. म्युकोझा मुळातच नरम असल्यामुळे त्याला थोडासा धक्का लागला किंवा जखम झाली तरी लगेच त्यातून रक्त यायला सुरूवात होऊ शकते.

आपलं नाक नेहमी थोडं ओलसर राहावं यासाठी नाकात निसर्गत:च पातळ पदार्थ बनण्याची व्यवस्था असते. उन्हाळ्यात मात्र नाकातला ओलसरपणा कमी होऊन नाक आतून कोरडं पडतं.

नाकाच्या आतल्या त्वचेला अगदी लागून रक्तवाहिन्या पसरलेल्या असतात. त्यामुळे ही त्वचा कोरडी झालेली असताना चुकून नाक- तोंड कुठे आपटलं गेलं किंवा कुणाला नाकात बोट घालून नाक कोरण्याची सवय असेल तर त्यामुळेही रक्तवाहिनी फुटते आणि नाकातून रक्त येतं.

नाकातून रक्त आल्यानंतर थंड पाण्याची धार डोक्यावर सोडा. यामुळे नाकातून रक्त येणे बंद होईल. नाकातून रक्त आल्यानंतर संबंधित व्यक्तीचं डोकं थोड्याशा उंचवट्यावर ठेवा. ज्यांना हि समस्या कायम होत असते त्यांनी १५ ते २० ग्रॅम गुलकंदाचं सकाळ-संध्याकाळ दूधासोबत सेवन करावं.

नाकातून रक्त आल्यानंतर डोक्यावर थंड पाण्याचा शिडकावा करावा किंवा बर्फाचे तुकडे एका रुमालात बांधून ते नाकावर ठेवा. यामुळे नाकातून रक्त येणे बंद होईल. नाकातून रक्त आल्यानंतर कांदा कापून नाकाजवळ धरल्यानेही फायदा होईल.

उन्हात जाण्यापूर्वी थोडा ओलसर केलेला रुमाल बाहेर जाताना नाकावर बांधावा. यामुळे थेट गरम हवा नाकात जाणार नाही. आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: इंडियन एक्सप्रेस आणि इंडिया टी व्ही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *