- आरोग्य

कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय

कॅल्शियम हा आपल्या शरीरासाठी एक महत्वाचा घटक आहे, जो स्नायूंच्या वाढीसाठी आणि हाडांच्या मजबूती साठी  महत्त्वपूर्ण घटक आहे. लहान मुलांपासून वृद्ध आणि तरुणांपासून गर्भवती स्त्रिया पर्यंत प्रत्येकाला आयुष्यभर कॅल्शियमची आवश्यकता असते.

आपण अन्नाद्वारे शरीरात कॅल्शियमची गरज  सहजपणे पूर्ण करू शकतो . चला तर मग जाणून घेऊया कॅल्शियमच्या नैसर्गिक स्त्रोतांविषयी ज्यामधून तुम्हाला भरपूर कॅल्शियम मिळेल.

कॅल्शियम वाढवण्यासाठी आहारात दुधाचा समावेश करा. परंतु जर आपल्याला दुध आवडत नसेल तर आपण दही किंवा पनीराचा आहारात समावेश करू शकता. यामुळे कॅल्शियम वाढवण्यासाठी मदत मिळेल.

कॅल्शियम वाढवण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करू शकता. हिरव्या पालेभाज्यांमध्ये ही कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. मेथी, पालक, कोबी, कोथिंबीर अश्या भाज्यामधून आपल्याला कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळते.  

कॅल्शियम वाढवण्यासाठी आहारात नारळ, सीताफळ, पेरू , आंबा, संत्री आणि अननस या फळांचा ही समावेश करू शकता. या फळांमध्ये पुरेसे कॅल्शियम असते. यांच्या मदतीने कॅल्शियमची कमी दूर करता येऊ शकते.

कॅल्शियम वाढवण्यासाठी आहारात बदाम, पिस्ता, अक्रोड, मनुके यांचा ही समावेश करू शकता.  या फळांमध्ये पुरेसे कॅल्शियम असते. या मधून तुम्हाला भरपूर कॅल्शियम मिळेल.

कॅल्शियम वाढवण्यासाठी आहारात हरभरा, राजमा, गहू, बाजरी, मुग डाळ  यांचा ही समावेश करू शकता. यांच्या मदतीने कॅल्शियमची कमी दूर करता येऊ शकते.

कॅल्शियम वाढवण्यासाठी आपण गुळ आणि शेंगदाणे खा. गुळ आणि शेंगदाणे खाल्याने आपली रोजची कॅल्शियमची गरज भागेल.

आपल्याला कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: टाईम्स ऑफ इंडिया आणि हेल्थलाईन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *