- आरोग्य

उन्हाळ्यात चेहऱ्यावर होणाऱ्या सन टॅनिंगपासून बचाव करण्यासाठी घरगुती उपाय

उन्हात फिरल्याने आपला चेहरा, हात काळपट दिसू लागतात यालाच सन टॅन असे म्हणतात. आपल्या चेहऱ्याची त्वचा हि नाजूक असते. सूर्य किरणांचा तसेच वातावरणातील धूळ आणि प्रदुषणाचा थेट परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो.

आपली त्वचा काळपट दिसू लागते आपण याकडे दुर्लक्ष केले तर यामुळे आपली त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. कमी वयातच चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणं दिसू लागतात.

सन टॅनिंगपासून बचाव करण्यासाठी त्वचेची काळजी घेणं गरजेचे आहे म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. सन टॅनिंगपासून बचाव करण्यासाठी घरगुती उपाय.

उन्हामध्ये बाहेर पडणार असाल तर 20 मिनिट आधी आपल्या हाताना चेहऱ्याला सनस्क्रिम लोशन लावा. सनस्क्रिम लोशन आपल्या  त्वचेचे बाहेरून आणि आतून होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करते.

सनस्क्रिम लोशन लावल्यामुळे सूर्याच्या किरणांचा आपल्या त्वचेवर परिणाम होत नाही. आणि आपल्या  त्वचेवर टॅनिंगचा परिणाम लवकर होत नाही.

उन्हामुळे चेहऱ्याची त्वचा काळपट झाली असल्यास त्यावर नारळाचे पाणी दिवसातून दोन वेळा लावा. असे केल्याने चेहऱ्यावरील काळपटपणा कमी होण्यास मदत होईल.

उन्हामुळे चेहऱ्याची त्वचा काळपट झाली असल्यास आपण एका वाटीमध्ये थोडेसे ग्लिसरीन घ्या त्यामध्ये चमचाभर लिंबाचा रस घाला. हे मिश्रण चेहऱ्याला, मानेला लावा. 30 मिनिटे राहूद्या नंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. असे केल्याने चेहऱ्यावरील काळपट पणा कमी होईल.

उन्हामुळे चेहऱ्यावर आलेला काळपट पणा घालवण्यासाठी २ चमचा बेसन पिठामध्ये 1 चमचा हळद पावडर मिसळून घ्या. त्यानंतर त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस आणि दूध मिसळून घ्या आता हे मिश्रण आपल्या चेहऱ्याला लावा. साधारणपणे 15 मिनिट राहूद्या त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या आपला चेहरा परत पहिल्यासारखा ग्लो करेल.

उन्हामुळे चेहऱ्यावर आलेला काळपट पणा घालवण्यासाठी 5 चमचे मुलतानी माती घ्या त्यामध्ये  चमचाभर कोरफड जेल मिसळा त्यानंतर त्यामध्ये थोडेसे गुलाब जल मिसळून चांगली पेस्ट बनवा. हि पेस्ट आपल्या चेहऱ्याला, मानेला लावा. 15 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने आपला चेहरा उजळेल.

चेहऱ्यावर आलेला काळपट पणा घालवण्यासाठी 2 चमचे बेसन पिठामध्ये 2  चमचे हळद आणि 2 चमचे दही मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर आणि टॅन झालेल्या भागावर लावा. 15 मिनिट पुर्ण सुकुन द्या त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने चेहऱ्यावरील काळपट पणा कमी होईल.

उन्हामुळे चेहऱ्यावर आलेला काळपट पणा घालवण्यासाठी पिकलेल्या पपईचा गर आणि मध एकत्र करुन चेहऱ्याला लावा असे केल्याने चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होण्यास मदत मिळेल.  

हे मिश्रण 30 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन टाका. असे केल्याने उन्हामुळे चेहऱ्यावर आलेला काळपट पणा कमी होऊन जाईल आणि आपला चेहरा परत पूर्वीसारखा ग्लो करेल.

चेहऱ्यावर आलेला काळपट पणा घालवण्यासाठी आपण दुधाच्या सायीचा हि वापर करू शकता. यासाठी 1  चमचा दुधाच्या सायीमध्ये चिमूटभर हळद मिसळा.

हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा.  10 ते 15 मिनिट चेहरा सुकून द्या त्यांतर थंड पाण्याने चेहरा धुवा. असे आठवड्यातून 2 वेळा करा. आपला चेहरा  परत पूर्वीसारखा दिसू लागेल.

चेहऱ्यावर आलेला काळपट पणा घालवण्यासाठी आपण हा सोपा उपाय हि करू शकता. यासाठी एक चांगले पिकलेले टोमॅटो घ्या. ते मिक्सरमध्ये बारीक करून एका वाटीमध्ये घ्या. त्या मध्ये थोडेसे दही मिसळून आपल्या चेहऱ्यावर लावा.

15 मिनिट चेहरा सुकून द्या त्यांतर थंड पाण्याने चेहरा धुवा. असे आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे त्वचा उजळ करण्यास मदत करतात. हा उपाय केल्याने आपला चेहरा उजळ होईल.

आपल्याला चेहऱ्यावर होणाऱ्या सन टॅनिंगपासून बचाव करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: इंडिया टुडे आणि फेमिना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *