गुळवेलाचे सेवन केलं तर बऱ्याच आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. गुळवेलामध्ये अनेक एन्टिऑक्सीडंट्स आणि एन्टीबॅक्टेरीअल गुण असतात. कॅल्शियम, कॉपर, जिंक आणि मॅग्निशियम असे घटक असतात.
गुळवेलाला गिलोय असं सुद्धा म्हणतात. गुळवेल हे एक चांगले प्रतिकारशक्ती बुस्टर आहे. चला तर मग जाणून घेऊयात गुळवेलाचे आरोग्यदायी फायदे.
गुळवेलाचा काढा चवीला कडसर लागतो. पण अत्यंत गुणकारी असतो. गुळवेल तुमच्या शरीरातील प्रतिकारक क्षमता वाढवते. ज्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला किंवा दुसऱ्या आजारांपासून संरक्षण मिळते.
गुळवेल ही वनस्पती डोळ्यांसाठी फायदेशीर मानली जाते. गुळवेलाच्या रसाचे सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारण्यात मदत मिळते. जर आपण गुळवेलाच्या रसाचे सेवन केलं तर डेंग्यु होण्यापासून आपला बचाव होऊ शकतो.
गुळवेलाच्या रसाच्या सेवनाने एसिडीटीचा त्रास दूर होण्यास मदत मिळते. गुळवेलाच्या रसाचे सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारून हृदय बळकट होते. वृद्ध व हृदयविकाराचे रुग्ण याचा लाभ घेऊ शकतात.
आयुर्वेदामध्ये गुळवेलाला ‘मधुनाशिनी’ अर्थात ‘साखर नष्ट करणारा’ म्हणून म्हटल गेलेलं आहे. गुळवेल हा मधुमेहावरील रामबाण उपाय मानला जातो. गुळवेलाच्या काढ्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
गुळवेलाच्या रसामध्ये पचनाचे विकार आणि ताण-तणाव दूर करणारे गुण असतात. कावीळ झाल्यास गुळवेलाचा काढा मधातून दोन-तीन वेळा घेतल्यास आराम मिळतो.
गुळवेलाच्या रसाचे सेवन केल्याने भूक वाढण्यास मदत मिळते. गुळवेलाच्या फळांचा रस काढून तो चेहऱ्यावर लावल्यास तारूण्यपिटीका कमी होण्यास मदत मिळेल. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी शक्यतो गुळवेलाचे सेवन करू नये.
आता जाणून घेऊयात गुळवेलाचा काढा कसा बनवायचा यासाठी प्रथम गुळवेलाच्या बोटभर लांब कांड्या स्वच्छ धुवून घ्या. त्या नंतर त्या कापून बारीक करा. काढा करण्यासाठी गुळवेल 50 ग्राम गुळवेल घेतल्यास अर्धा लिटर ते पाऊन लिटर पाण्यात मिसळून ते चांगले उकळून घ्या. हा काढा चवीला कडसर लागतो. पण अत्यंत गुणकारी असतो.
आपल्याला गुळवेलाचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: फार्मइजी ब्लॉग आणि डाबर.