- आरोग्य

ताक पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे

दह्यामध्ये पाणी टाकून घुसळून ताक तयार केल जातं. जरी दह्यापासून ताक तयार केल जात असले तरी हि दही आणि ताक यापासून मिळणारे फायदे वेगवेगळे असतात. ताक प्यायल्यामुळे आपल्या शरीरामधील पाण्याची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. आज आपण जाणून घेणार आहोत ताक पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे.

ह्या दिवसात उन्हाळी लागण्याची समस्या बऱ्याच जणांना होत असते. यासाठी 1 ग्लास ताकात थोडासा गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होण्यास मदत मिळते. तोंडाला आतल्या बाजूने फोड आल्यास तोंड आल्यास अथवा दिवसातून 3 ते 4 वेळा ताकाने गुळण्या केल्याने आराम मिळतो.

उन्हाळ्यात एक ग्लास ताकामध्ये थोडीशी जिरे पावडर, कोथिंबीर, पुदिना आणि मीठ मिसळून प्यायल्याने शरीरात निर्माण झालेली उष्णता कमी होण्यास मदत होते.

जेवण केल्यानंतर ताक प्यायल्याने अन्न पचन व्यवस्थित होते. तसेच अपचन, गॅस होत नाही. नियमित ताक प्यायल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत मिळते.

दात येत असताना लहान मुले चिडचिड करत असतात. अश्यावेळी त्यांना दिवसातून 3 ते 4 वेळा चमचाभर ताक पाजा. असे केल्याने दात येताना होणारा त्रास कमी होतो.

छातीत जळजळ होत असल्यास एक ग्लास ताकामध्ये चिमुटभर सैंधव मीठ टाकून घ्या. दिवसातून 2 वेळा असे ताक प्यायल्याने छातीत होणारी जळजळ थांबेल.

उच्च रक्तदाब असल्यास आपण आपल्या आहारात ताकाचा समावेश अवश्य करावा. नियमित ताक प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

डोकेदुखीचा त्रास होत असल्यास ताकामध्ये थोडसे जायफळ उगाळून मिसळा असे ताक प्यायल्याने डोकेदुखी थांबण्यास मदत मिळते.

ताकामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असत त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. जे लोक नियमित ताक पितात त्यांना  हाडांचे विकार कमी प्रमाणात होतात.

आपल्याला ताक पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: फार्म इजी आणि हेल्थलाईन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *