- आरोग्य

दिवसभरात २, ३ वेलची खाण्याचे फायदे

वेलचीला आयुर्वेदात खूप महत्व आहे. बऱ्याचदा बिर्याणी आणि खीर , शिरा यासारख्या पदार्थांची  चव वाढविण्यासाठी आपण  वेलचीचा वापर करत असतो. याशिवाय चहा बनवण्यासाठी वेलची वापर केला जातो. चला तर आज जाणुन घेउयात वेलची खाण्याचे फायदे.

जर तुम्हाला घसा खवखवणे वा घसा दुखत असेल तर सकाळी सकाळी आणि झोपायच्या वेळी १ वेलची चावून खा. आणि कोमट पाणी प्या. यामुळे घसा दुखणे दूर होण्यास मदत मिळेल.

वेलची खाल्ल्याने पुरुषांची शारीरिक दुर्बलताही दूर होते. आपल्या रोजच्या आहारात वेलची समावेश केल्यास हळूहळू तुमचे वजन वाढवण्यास मदत होईल.

वेलची खाल्ल्याने स्मरणशक्तीत सुधारते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हृदयासंबंधीचे आजार जडतात. हृदयाची गती सुरळीत ठेवण्यासाठी वेलची खाणे फायदेशीर ठरते.

रोज 2 वेलची खाल्याने आपले केस मजबूत होण्यास मदत मिळेल. तसेच केस गळण्याचे प्रमाण हि कमी होईल. आपले केस अधिक काळे आणि चमकदार होतील.

शरीराच्या पचन प्रक्रियेमध्ये फायबर अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. वेलचीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधामध्ये आणि थोडीशी वेलचीपूड मिसळून प्यायल्याने पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते.

वेलची खाल्ल्याने चांगली भूक लागते. वेलची चावून खाल्ली, तर ॲसिडीटी दूर होते शिवाय होणारी जळजळ थांबते. वेलचीने गॅसची समस्या दूर होते. तसेच पचनासाठी वेलची मदत करते. पोट फुगलं किंवा जळजळ होत असल्यास वेलची यातून तुमची सुटका करते.

वेलची खाल्याने मन शांत राहण्यास मदत मिळते तसेच मनाची एकाग्रता होण्यास मदत मिळते. रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यास, शरीरातील  आम्ल नियंत्रणात ठेऊन पित्तालाही अटकाव करण्यासाठी वेलची खाणे उपयोगी ठरते.

कमकुवत पाचनशक्ती मजबूत करण्यासाठी वेलची खूप प्रभावी आहे, वेलचीच्या वापराने पचन शक्ती वाढते, वेलची नियमित सेवन केल्यास अन्न पचन समस्यांपासून सहज सुटका होते. तोंडाला दुर्गंधी येत असल्यास वेलची खाल्याने आपल्या तोंडाला दुर्गंध येणार नाही.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी वेलचीचे सेवन करणे आवश्यक आहे कारण वेलचीमध्ये फायबर आणि पोटॅशियम असते ज्यामुळे आपण उच्च रक्तदाब ग्रस्त असल्यास उच्च रक्तदाब पातळी राखते. म्हणून आहारात वेलची घ्या, यामुळे शरीरातील रक्तदाब पातळी सुधारेल.

आपल्याला वेलची खाण्याचे फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: नेटमेड ब्लॉग आणि फूड एन डी टि व्ही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *