- आरोग्य

शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी आपल्याला आजारांपासुन वाचविण्याचे कार्य करतात, जेव्हा आपल्या शरीरातील रक्तामध्ये पांढऱ्या रक्त पेशींची कमतरता येते तेव्हा आपली प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते.

पांढऱ्या रक्त पेशींचे मुख्य कार्य म्हणजे शरीरास संसर्ग आणि रोगापासून संरक्षण देणे. पौष्टिक आहारातूनच पांढऱ्या रक्त पेशींचे प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं. जर आपल्या हि  शरीरात पांढऱ्या रक्त पेशी कमी असतील तर घाबरू नका.

या काही घरगुती उपायानी पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यास मदत होईल. चला शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्याचे घरगुती उपाय जाणुन घेउयात.

पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यासाठी आपण हा सोपा उपाय करू शकता. यासाठी  दोन चमचे तीळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. नंतर पाणी गाळून तिळाची पेस्ट करुन घ्या.

यामध्ये मध मिसळून दिवसातुन दोन वेळेस हे मिश्रण खा. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होईल. तसेच आपल्या रक्तातील पांढऱ्या पेशी हि वाढतील.

टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते. व्हिटॅमिन सी केवळ पांढऱ्या रक्त पेशींना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करत नाही तर त्यांची संख्या वाढवते.

लसणामध्ये अँटीऑक्सिडंट तसेच  बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक असतात. रिकाम्या पोटी २ ते ३ लसणाच्या  पाकळ्या रक्त पेशी तयार करण्यात मदत करतात आणि आपली रोगप्रतिकार शक्ती बळकट करून रोगांशी लढण्यास मदत करतात.

पपईच्या पानांमध्ये एसिटोजेन्स असतात, जे रक्तातील पांढऱ्या पेशींची संख्या वाढवून प्रतिकारशक्तीला प्रोत्साहन देतात. खरं तर, डेंग्यू ताप आल्यावर पांढऱ्या रक्त पेशी कमी होतात यावर  एक चांगला उपाय म्हणून पपईची पाने काम करतात.

रक्तातील पांढऱ्या पेशींची संख्या कमी झाल्यास दररोज सकाळी रिकाम्या पोटी 3-4 आवळे खा. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ‘सी’ असते जे रक्तातील पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी उपयोगी असते.

पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यासाठी आपल्या आहारात पालकचा समावेश करा. पालकची भाजी  व्हिटॅमिन ‘के’चा चांगला स्रोत असून पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यासाठी आपल्या आहारात दह्याचा समावेश करा. दह्यामधील प्रोबायोटिक्स रोग प्रतिकारशक्ती वाढवते.  पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यासाठी मदत करतात.

पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यासाठी गुळवेल कांड्या थोड्याश्या ठेचून रात्रभर पाण्यात भिजायला ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्या. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. जर गुळवेलच्या कांड्या उपलब्ध झाल्या नाहीत तर गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध असत ते सुद्धा आपण वापरू शकता.

किवीमध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट असतात आणि त्यामध्ये पोटॅशियम आणि सी आणि ई जीवनसत्त्व असतात. हे सर्व पोषकद्रव्ये तुमची प्रतिकारशक्ती वाढविण्यात आणि पांढऱ्या रक्त पेशी वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

आपल्याला शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: स्टाईलक्रेझ आणि तारदलाल 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *