Health
- आरोग्य

सब्जाचं सेवन केल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे

उन्हाळ्याच्या दिवसात सब्जाचं सेवन केल्याने शरीरात होत असलेला दाह कमी करण्यास मदत होते. सब्जामध्ये कार्बोहायड्रेट, विटॅमिन ए, के, ई, बी, मॅग्नेशियम, कॅल्शियम फायबर, आणि पोटॅशियम असे घटक असतात. चला तर जाणुन सब्जाचं सेवन केल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे.

सब्जा शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मदत करतो.म्हणूनच सब्जाचा वापर लिंबूपाणी, सरबत, मिल्कशेक अशा गोष्टी बनवताना करतात.

सब्जा वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. सब्जामध्ये अल्फा-लिनोलेनिक असिड असतं. यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

सब्जामुळे बद्धकोष्ठतापासून आराम मिळतो. झोपायला जाण्यापूर्वी एक ग्लास दुधाबरोबर अर्धा चमचा सब्जाचे सेवन केल्याने पोट साफ होण्यास मदत होते. आणि बद्धकोष्ठतापासून आराम मिळतो.

सब्जामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. नारळाच्या तेलात सब्जा भिजवून त्याने त्वचेवर मसाज केल्याने त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी एक ग्लासभर पाण्यात चमचाभर सब्जा मिसळून प्या. त्यामुळे भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

सब्जाचं सेवन केल्याने पोटातील जळजळ कमी होते अॅसिडिटी देखील दूर होण्यास मदत मिळते. सब्जाचं सेवन केल्याने शरीराची उष्णता कमी होण्यास मदत मिळते. तसेच लघवी करताना होणारी जळजळ ही बंद होते.

सब्जाचं सेवन केल्याने आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत मिळते. कोरड्या आणि रुक्ष केसांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी सब्जाचं सेवन केल्याने केसांची चांगली वाढ होण्यासाठी आवश्यक असणारे जीवनसत्त्व, लोह आणि प्रथिने आपल्याला मिळू शकतात.

आपल्याला सब्जाचं सेवन केल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: नेटमेड ब्लॉग आणि हेल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *