चामखीळ शरीरावर कुठेही येते बहुतांश वेळा चेहऱ्यावर मानेवर असते. चामखीळ किंवा मोस हे पापिलोमा व्हायरस मुळे येतात. चामखीळ शरीरासाठी धोकादायक नसतात पण शरीराची सुंदरता खराब करतात. बऱ्याचदा चामखीळ घालवण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च केला जातो. आज आपण जाणून घेणार आहोत चामखीळ घालवण्याचे घरगुती उपाय
त्वचेच्या सौंदर्यासाठी कोरफड ही उपयुक्त औषधी वनस्पती खूप उपयोगी आहे. चामखीळ अथवा तीळ यावर ती प्रभावीपणे काम करते. यासाठी कोरफडीचा गर चामखीळ असलेल्या जागेवर कापडाने बांधून ठेवा. साधारण तासाभराने काढून धुवून घ्या असे दिवसातून तीन वेळेस केल्यास चामखीळ समस्येपासून सुटका होते.
चामखीळ घालवण्यासाठी केळांचाही वापर करता येतो. केळाचे बारीक गोल तुकडे करून ती चामखीळ वर लावावी. काही दिवस हे केल्यास चामखीळीचा नायनाट होतो.
चामखीळ घालवण्यासाठी रोज कमीत कमी ३ वेळा कापसाने चामखीळ वर अॅपल सायडर व्हिनेगर लावा आणि कापूस त्यावर लावून ठेवा. काही दिवसानंतर चामखीळचा रंग बदलेल आणि सूकून जाईल.
नारळाचे तेल रोज झोपताना चामखीळ असलेल्या ठिकाणी लावल्यास काही दिवसात फरक पडतो. याने चामखीळ निघून जाण्यास मदत मिळेल.
कोथिंबीर रोजच्या वापरातील वनस्पती आहे ही बारीक चिरून त्याची पेस्ट बनवावी. या पेस्ट चा वापर आपण चामखीळसाठी करू शकतो. ही पेस्ट चामखीळीवर पंधरा मिनिटे लावून ठेवा नंतर धुवून टाका याने चांगला परिणाम होतो.
लिंबाचा रस हा उपाय यासाठी काही वेळा वापरला जातो. जिथे चामखीळ असेल त्या जागेवर कापसाच्या बोळ्याने हलका लिंबाचा रस लावा व कापूस दोन मिनिटे तसाच ठेवा. असे केल्याने चामखीळ निघून जाण्यास मदत मिळेल.
चामखीळ घालवण्यासाठी बटाट्याचा रस मोसच्या जागी लावल्याने हळूहळू कमी होण्यास मदत होते. चामखीळ घालवण्यासाठी आपण त्यावर संत्र्याची साल बारीक करून त्यावर लावा. हलक्या हाताने तो भाग चोळा. नियमित हा उपाय केला तर काही दिवसात चामखीळीचा रंग बदलेल आणि चामखीळ नाहीशी होईल.
मधाला आयुर्वेदात खूप महत्व आहे. यात अनेक गुणधर्म व पोषक तत्वे असतात. चामखीळीवर मध हे प्रभावीपणे काम करते. चामखीळीवर मध लावून ठेवा व एका तासाने धुवून टाका. असे काही दिवस केल्यास चामखीळ नाहीशी होते.
आपल्याला चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेल्थलाईन