कोरा चहा
- आरोग्य

कोरा चहा (BLACK TEA) पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे

आपल्या दिवसाची सुरुवात ही चहा पासूनच होत असते पण या चहाचे काही फायदे आहेत ते आपल्याला माहीत नसतात म्हणूनच हा लेखन प्रपंच. चहा हा आपल्याकड़े आदरातिथ्याचा महत्वाचा भाग आहे. पण चहा हा काही एका प्रकारचा नसतो. चहाचे अनेक प्रकार आहेत.

त्यातला कोरा चहा हा चहाचा प्रकार केवळ फ्रेशनेससाठी नाही तर औषध म्हणून प्राशन केला जातो. कोरा चहा हा अनेक प्रकारांनी आपल्या आरोग्याला उपकारक ठरतो.

सकाळी कोरा चहा प्याल्यास अनेक प्रकारच्या रोगांपासून आपली सुटका होते. मात्र कोरा चहा आपल्या नेहमीच्या चहाप्रमाणे दूध घालून तयार करीत नाहीत. तो दुधाशिवाय केला जात असतो. काही लोक तर हा चहा साखरही न घालता करीत असतात.

काळा चहा सुगंधी, चवदार आहे आणि हा खऱ्या अर्थाने ऊर्जा वाढीवण्याचे (एनर्जी बूस्टर) काम करतो. या चहाचे अनेक फायदे आहेत. चला तर जाणुन घेउयात कोरा चहा पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे

कोऱ्या चहातल्या विशिष्ट घटकांमुळे तरतरी आणि उत्साह वाढते आणि त्यामुळे कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते. कोरा चहा हा आपल्या हृदयाला फार गुणकारी असतो.

हा चहा प्याल्याने आपले हृदय निरोगी आणि बळकट रहाते. दररोज दोन ते तीन कप कोरा चहा प्राशन करण्याने आपण प्रोस्ट्रेट, फुफ्फुस आणि किडनी यांच्या कर्करोगापासून मुक्त राहू शकतो.

 मेंदूच्या पेशींनाही हा चहा प्रेरणा देतो. कोरा  चहा प्यायल्याने मेंदूच्या पेशींना रक्ताचा पुरवठा वाढतो. दिवसातून चार वेळा हा चहा प्राशन केला तर सगळ्या प्रकारच्या तणावापासून सुटका होते.

या चहात टॅनीन हे द्रव्य असते आणि ते आपल्या पचन संस्थेला गुणकारी ठरते. पचनाची ताकद वाढवते आणि गॅसेस वगळता पचन संस्थेचे अनेक दोष दूर करण्यास ते उपयोगी ठरते.

कोरा चहा प्यायल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, ज्यामुळे आपले वजन हळूहळू कमी होऊ लागते. सोबतच, शरीरातील चयापचय प्रक्रिया वाढवते जे वजन कमी करण्यास फायदेशीर असे.

कोऱ्या चहामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सीडेन्ट असतात जे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. चांगल्या प्रतिकारशक्तीमुळे बरेचसे आजार लवकर होत नाही सोबतच आपले आरोग्य देखील चांगले राहते.

कोऱ्या चहाचे परिणाम आपल्या त्वचेवरही होतो. कोरा चहा प्यायल्याने त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या कमी होतात. संसर्गासारखे त्चचेचे त्रास या चहाने कमी होतात.

काही लोक हा कोरा चहा सकाळी पितात. तो स्वत: गुणकारी तर असतोच पण त्याच्या या गुणांवर कसलाही परिणाम न करता त्यात काही औषधी घालताही येतात.

कोरा चहा प्यायल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन बरेचसे पोटाचे विकार कमी होऊ शकतात. अतिसार आणि उलट्या होण्यालासुद्धा यामुळे अटकाव होतो.

कोरा चहा तयार करताना त्यात गवती चहा मिसळावा त्यामुळे अंगातले लहान मोठे ताप आणि मरगळ कमी होते. याच चहात तुळशीचे बी घातल्यास खोकला, सर्दी असे आजार दूर पळतात. तर असा आहे हा अती गुणकारी कोरा चहा रोज प्यायला पाहिजे.

कधी कधी आपल्या पायांना घाम आल्याने दुर्गंधी येत असते. पायांच्या दुर्गंधीपासून सुटका हवी असल्यास आपण हा उपाय करू शकता. काळा चहा तयार करून घ्या. थंड झाल्यानंतर पायाला लावा. काही मिनिटे ठेवा. नंतर धुऊन टाका हा उपाय केल्याने तुमच्या पायावरील बॅक्टेरिया आणि फंगल निघून जाईल. 

आपल्याला कोरा चहा (BLACK TEA) पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: टाईम्स ऑफ इंडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *