- आरोग्य

काकडी खाण्याचे १० आश्चर्यकारक फायदे

आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपल्या भोवती पुष्कळ गोष्टी आहेत. जर या सर्व गोष्टीचा योग्य रीतीने वापर केला तर आपण सहजपणे एक निरोगी जीवन जगू शकतो. यासाठी आपल्याकडे योग्य माहिती असणे आवश्यक आहे.

म्हणून आम्ही आज आपल्यासाठी काकडी बद्दल खूप चांगली माहिती घेऊन आलोय. चला जाणून घेऊया की काकडी आपल्या साठी कशाप्रकारे लाभदायक आहे.

काकडी एक असा खाद्य पदार्थ आहे जो पुर्ण भारतात सहज मिळतो. काकडी शरीराला शीतलता आणि ताजेपणा प्रदान करते. याला तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता.

जेसे सलाड, सँडवीच, किंवा तिखट मिठ लावुन खाऊ शकता. काकडीचे स्वास्थवर्धक आणि सौंदर्यवर्धक गुण दोन्ही अगणित आहेत. काकडी आपले अनेक रोगांपासून संरक्षण करते. चला जाणून घेऊया?

काकडीमध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, विटामिन सी असे पोषक घटक असतात. शक्यतो काकडी ही कच्ची खावी, कारण कच्ची काकडी पौष्टिक व पचण्यास हलकी असते. काकडीच सेवन केल्याने पाण्याची कमी दूर होते. गर्मी केवढी पण असो जर आपण काकडी खाल्ली तर कूल कुल राहाल.

कॉम्पुटर वर खूप नजर लावून काम करणाऱ्यांच्या डोळ्यांना आराम मिळावा व त्यांच्या डोळ्यांचा शिणवटा जावा म्हणून काकडीच्या खापा डोळ्यावर ठेवू शकता.

तसेच डोळ्याभोवतीची काळी वर्तुळ कमी व्हावीत म्हणूनही काकडीचे पातळ काप डोळयाखाली ठेवू शकता. काकडीचा कीस चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील मुरुम, पुटकुळ्या कमी होण्यास मदत मिळते.

काकडी खाल्याने वजन कमी करण्यात मदत मिळते आपल्याला जर सारखी सारखी  भुक लागत असेल तर आपल्यासाठी काकडी खूप फायदेशीर ठरू शकते.

कारण काकडीमध्ये कॅलरीज अत्यंत कमी प्रमाणात असतात. म्हणून काकडी खाल्याने आपले वजन वाढू शकत नाही. काकडी खाल्याने तुमची लहान लहान भूक थांबेल. आणि तुमचे वजन वाढणार नाही.

काकडी हि सौंदर्य वर्धक सुद्धा आहे. काकडीच्या रसाचा त्वचेवर वापर केल्याने त्वचा मऊ आणि चमकदार बनते. काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्याने टॅनिंग कमी होण्यास मदत मिळते तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतात.

हातापायांची जळजळ होत असल्यास काकडीचे काप तळहातावर व तळपायावर चोळावेत. असे केल्याने हातापायांच्या जळजळीपासून आराम मिळेल.

जर आपल्याला केस वाढवायचे असतील तर यासाठी आपण काकडीचे सेवन करा. काकडीत सिलिकॉन आणि सल्फरची मात्रा असते, ज्यामुळे केसांची लांबी वाढण्यास मदत मिळते.

आपल्याला लघवी करताना जळजळ होत असेल तर काकडी रस लिंबुरस, जिरेपूड व खडीसाखर घालून प्या. यामुळे लघवीची जळजळ दूर होते.

जर तुमची स्क्रीन तेलकट असेल तर तुम्ही आपल्या चेहऱ्यावर काकडी लावू शकता. जर काकडीचा रस आपल्या चेहऱ्यावर लावला तर आपल्या चेहऱ्यावरून तेलकटपणा  गायब होईल.

भूक लागत नसेल तर काकडीचे काप करून त्याला काळे मीठ, लिंबू रस, व जिरेपूड लावून खा. यामुळे भूक चांगली लागते. रात्री झोप लागत नसल्यास तर काकडीचे काप डोक्यावर ठेवून झोपा. असे केल्याने आपल्याला झोप येईल.

काकडी खाल्यामुळे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. काकडीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांना खूप फायदा देत. यामुळे इंसुलिनच्या पातळी नियंत्रित राहते. काकडी मध्ये स्टीरॉल आढळला जातो जो कोलेस्ट्रॉल ची पातळी कमी करत.

रोज काकडी खाल्याने पोटाचे आजार कमी होतात. जसे की, बध्दकोष्टता , अपचन, अल्सर आदी. कारण काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते यामुळे  शरीरातील अनावश्यक आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात.

आपल्याला काकडी खाण्याचे १० आश्चर्यकारक फायदे  हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: फार्मइजी ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *