- आरोग्य

अंजीर खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

उन्हाळ्याच्या सुरुवातीला मिळणारे अंजीर हे फळ चवीला मधुर आणि पौष्टिक असते. अंजीरामध्ये विटामिन ए विटामिन बी 1, विटामिन बी 2, कॅल्शियम, लोह असे शरीराला उपयोगी घटक द्रव्ये असतात. आज मराठी ज्ञानच्या या लेखात जाणून घेणार आहोत. अंजीर खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे.

अंजीराचे सेवन केल्याने पित्तविकार दूर होण्यास मदत मिळते. अपचन, एसिडीटी, चा त्रास असल्यास दररोज सकाळी आणि संध्याकाळी 2 अंजीर कपभर दुधामध्ये भिजवून खाल्याने अपचन, एसिडीटी, चा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

अंजीराचे सेवन केल्याने शरीरातील रक्तशुद्ध होते, तसेच आपल्याला उष्णतेचा त्रास होत असल्यास अंजीराचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते. ज्यांना सारखी सारखी तहान लागते त्यांनी अंजीराचे सेवन केल्याने सारखी तहान लागणार नाही.

नियमित रात्री झोपण्याआधी 1 ग्लासभर दुधामध्ये 2 अंजीर भिजवून खाल्याने हाडांचा कमकुवतपणा कमी होण्यास मदत मिळते. लहान मुलांच्या हाडाचा विकास करण्यासाठी अंजीर दुधामध्ये भिजवून फायदा होतो. तसेच गर्भवती स्त्रियांनी अंजीर दुधामध्ये भिजवून खाल्याने गर्भाचा विकास चांगल्याप्रकारे होण्यास मदत मिळते.

सकाळी आणि संध्याकाळी 2 ते 4 अंजीर पाण्यामध्ये भिजवून खाल्याने मुळव्याधीचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. नियमित अंजीराचे सेवन केल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते.

अंजीरांमध्ये पेक्टिन नावाचे विद्रव्य फायबर असते जे रक्तामध्ये असलेल्या कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी मदत करते म्हणून आपल्याला शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करायची असल्यास आपण आपल्या आहारात अंजीराचा समावेश केला पाहिजे.

अंजीरामध्ये पोटॅशियम आणि सोडियम कमी असते, म्हणून अंजीर खाल्ल्याने शरीरात पोटॅशियम आणि सोडियमचा समतोल राखला जातो. यामुळे रक्ताभिसरणाचे कार्य सुलभ होते आणि उच्च रक्तदाबाची समस्या टाळता येऊ शकते.

ज्यांना आपले वजन वाढवायचे आहे त्यांनी रात्री झोपण्याआधी 1 ग्लासभर दुधामध्ये 2 ते 4 अंजीर भिजवून खाल्याने आपल्याला वजन वाढण्यास मदत मिळेल.

आपल्याला अंजीर खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: वेब एम डी आणि तरलदलाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *