- आरोग्य

गुडघे दुखीवर प्रभावी घरगुती उपाय

काही वर्षापूर्वी वयाची चाळीशी गाठली कि गुडघे दुखीचा त्रास जाणवायला लागायचा. परंतु आजकालच्या धावपळीच्या युगात तरुणवयातच गुडघेदुखीचा त्रास जाणवायला लागलाय. यामागे बरीच कारणे आहेत.

आहारातील पोषकतत्वाचा अभावामुळे तरुणवयातच गुडघेदुखीचा त्रास जाणवायला लागतो. थंडी वाढली कि हा त्रास जास्त जाणवायला लागतो. म्हणूनच आज आपण गुडघे दुखीवर सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

गुडघेदुखी पासून आराम मिळवण्यासाठी आहारात कच्च्या कांद्याचा समावेश करा. कांद्यामध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्याच बरोबर सल्फर हा घटक कांद्यामध्ये असतो. कांद्याचा आहारात समावेश केल्याने आपली प्रतिकारशक्ती सुधारते. त्याचबरोबर गुडघेदुखीच्या वेदना कमी होऊ लागतात.

बऱ्याचदा गुडघेदुखीचा त्रास होत असल्यास गुडघ्याला सूज हि येते अशावेळी गुडघ्याच्या सांध्याला गरम तेलाने मालिश करा. यामुळे रक्त परिसंचरण सुधारेल आणि आराम मिळेल.

यासाठी 2 चमचे मोहरीचे तेल घ्या त्यामध्ये  5 लसणाच्या कळ्या घालून गरम करा. आणि त्यानंतर त्या कोमट तेलाने मालिश करा. असे केल्याने आपल्याला लवकर आराम मिळेल. आणि सूज हि कमी होईल.

गुडघेदुखी पासून आराम मिळवण्यासाठी एक छोटा आल्याचा तुकडा घ्या. तो तुकडा ठेचून 1 कप पाण्यामध्ये  उकळा. त्यानंतर ते पाणी गाळून घ्या. त्यामध्ये चमचाभर मध आणि लिंबाचा रस मिसळा. आपल्या गुडघ्याच्या वेदना बऱ्या होईपर्यंत दिवसातून ते 2-3 कप असे घ्या.

अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे गुडघेदुखी कमी करण्यास मेथीचे दाणे उपयुक्त असतात. याबरोबरच, मेथीचे दाणे उष्ण गुणधर्मी असतात, ज्यामुळे ते संधिवात दुखीपासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त असतात.

गुडघेदुखी पासून आराम मिळवण्यासाठी 1 चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी पाणी काढून हे दाणे चावून खा. एक ते दोन आठवडे असे करा. असे केल्याने गुडघेदुखीचा त्रास कमी व्हायला मदत मिळेल.

रात्रभर पाण्यात भिजवलेले काळे तीळ सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास सांधे दुखीपासून आराम मिळतो. गुडघेदुखी पासून आराम मिळवण्यासाठी मुठभर मेथीचे दाणे भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

त्या मध्ये थोडेसे पाणी मिसळून आपल्या गुडघ्यावर रात्री बांधा. अर्धा ते 1 तास राहूद्या. आठवड्यातून 2 वेळा असे करा. असे केल्याने गुडघ्याच्या वेदना कमी होतील.

आपल्याला गुडघे दुखीवर सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: टाईम्स ऑफ इंडिया ब्लॉग 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *