- आरोग्य

रोज सकाळी कोमट पाणी पिण्याचे फायदे

कोमट पाणी पिणे शरीरासाठी लाभदायक असते. कोमट पाणी पिण्याने अनेक आरोग्य समस्या कमी होऊ शकतात. चला जाणून घेऊयात कोमट पाणी पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे.

कोमट पाणी प्यायल्यामुळे मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत होते. वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. रात्रीच्या जेवणानंतर आणि झोपण्यापूर्वी आपण कोमट पाणी प्यावे, असे केल्याने चांगली चांगली झोप येण्यास मदत मिळेल. आणि दुसर्या दिवशी तुमचे पोट व्यवस्थित साफ होईल.

दररोज एक ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस पिळून ते पाणी प्यायल्याने  शरीरात अतिरिक्त चरबी जमा होणार नाही. नियमित कोमट पाणी प्यायल्याने मुतखड्याचा त्रास होण्याची शक्यता कमी असते.

दररोज एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने चेहर्यासवर येणारे मुरुम कमी होतील. आणि चेहरा चमकदार होईल. कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस पिळून ते पाणी प्यायल्याने प्रतिकारशक्ति वाढण्यास मदत मिळेल.

घसा दुखत असेल कोमट पाण्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो. दररोज एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पाचनशक्ति सुधारण्यास मदत होते. कोमट पाणी प्यायल्याने घसा आणि नाकातील कफ बाहेर पडण्यास मदत होते.

एक ग्लास कोमट पाण्यामध्ये चमचाभर हळद मिसळून प्यायल्याने त्वचेमधील विषारी घटक बाहेर निघण्यास मदत होते. त्वचा साफ, स्वच्छ आणि उजळ होते. हळदीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.

आपल्याला रोज सकाळी कोमट पाणी पिण्याचे फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: एम्सइंडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *