- आरोग्य

अळूच्या पानापासून मिळणारे आरोग्यदायी फायदे

अळूची पाने खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. बाजारामध्ये सहज उपलब्ध असलेला अळू बहुतांशी अळुच्यावड्या यासाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये ए, बी, सी, कॅल्शियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते.

जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. आहारामध्ये अळूच्या पानांचा समावेश केल्यास अनेक समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते. आज आपण अळूच्या पानांचे आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत.

अळूच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए असल्यामुळे डोळ्यांसाठी लाभकारक ठरते. अळूच्या पानांचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहून डोळ्यांच्या मांसपेशी मजबूत होतात. त्यामुळे अळूच्या पानांचे सेवन करा.

अळूच्या आपल्या आहारात समावेश केल्याने रक्त वाढवण्यास मदत मिळते. अळूच्या पानांमधून आपल्या शरीराला फायबरचा पुरवठा होतो. अळूच्या पानासोबत डाळीचा समावेश केल्यास प्रोटीन्सचा देखील पुरवठा होतो.

त्यामुळे अळू एक उत्तम आणि परिपूर्ण आहार बनतो. अन्नपचनाच्या समस्येने त्रस्त असाल तर या पानांचे सेवन नक्की करा. त्यामुळे पचनक्रिया सुधारून पोटाचा समस्येवर फायदा होतो.

वजन कमी करायचे असेल तर अळूच्या पानांचे सेवन करावे. या पानांमध्ये फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. आळूची पाने खाल्ल्याने वजन कमी होण्यास फायदा होतो.

अळूच्या पानांचा आपल्या आहारात समावेश केल्याने आपल्या शरीरावरील जखमा लवकर भरून येतील. तसेच हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळेल.

ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी अळूची पाने खाणे फायदेशीर आहे. अळू हे थंड गुणधर्मयुक्त असल्याने वात-पित्त-कफ असे अनेक आजार दूर होतात. सांधेदुखीने त्रस्त असाल तर अळूच्या पानांचे सेवन करा. तुम्हाला नक्की आराम मिळेल.

अळूच्या पानांचा आपल्या आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत मिळते. अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम हा घटक असतो.

त्यामुळे हाडांची कमजोरी कमी करण्यास मदत होते. अळूच्या आपल्या आहारात समावेश केल्याने वाढत्या वयानुसार हाडांची होणारी झीज कमी होते. अळूच्या पानांचे सेवन केल्याने सांधेदुखीवर आराम मिळेल.

आपल्याला अळूच्या पानापासून मिळणारे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: तारळदलाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *