- आरोग्य

चेहरा उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय

आजकालच्या धावपळीच्या युगात आपल्या त्वचेच्या काळजी घेण्यासाठी आपल्याला बऱ्याचदा  वेळ मिळत नाही. वातावरणातील धूळ, माती, प्रदूषण, बदलणाऱ्या हवामानामुळे आपल्या चेहऱ्याचा रंग गडद होत जातो म्हणूनच आज मराठी ज्ञानच्या या लेखात आपण चेहरा उजळण्यासाठी सोप्या घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत.

चेहरा उजळण्यासाठी एका वाटीमध्ये 2 चमचे साखर घ्या त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर हलक्या हाताने ह्या मिश्रणाने आपला चेहरा, मान आणि हातांवर मसाज करा. गोलाकार दिशेमध्ये मसाज करा.

साखरेचे दाणे त्वचेवर विरघळत नाहीत तोपर्यंत मसाज करत राहा. असे केल्याने रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत मिळते. या स्क्रबमुळे त्वचेवरील जमा झालेली घाण स्वच्छ होईल आणि आपल्या चेहऱ्यावरील काळपटपणा हि हळू हळू कमी होईल.

चेहऱ्यावरील काळपटपणा घालवण्यासाठी एक पिकलेली केळी घ्या. वाटीमध्ये कुस्करून घ्या त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळा हे मिश्रण चेहऱ्यावर लावून 30 मिनिटे ठेवा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन टाका. चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून 2 वेळा तरी असे करा.

चेहरा उजळण्यासाठी संत्र्याची साल सुकवून घ्या. सुकल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून थोड्याश्या दुधामध्ये मिसळून पेस्ट तयार करा. हि पेस्ट चेहऱ्यावर 20 मिनिटे लावा. असे केल्याने सूर्यप्रकाशामुळे काळी पडलेली त्वचा उजळेल आणि चेहरा साफ होईल.

चेहऱ्यावरील डाग आणि सूरकुत्या कमी होण्यासाठी शहाळ्याच्या नारळाचे पाणी चेहऱ्यावर दिवसातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सूरकुत्या कमी होण्यास मदत मिळेल.

चेहरा उजळण्यासाठी आपण हा सोपा उपाय करू शकता. 7 ते 8 बदाम भिजवून दुधासोबत मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. हि पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटे तशीच राहूद्या. नंतर थंड पाण्याने धुवा.

असे केल्याने सूर्यप्रकाशामुळे काळी पडलेली त्वचा उजळेल आणि चेहरा साफ होईल.  यासोबतच आपण बदाम तेलाने दररोज 5 ते 10 मिनिटे आपल्या चेहऱ्याची मालिश देखील करू शकता.

या बरोबरच आपल्या चेहऱ्याचा रंग काळपट होऊ नये यासाठी आपण पुढीलप्रमाणे काळजी घेऊ शकता. जेव्हा आपण घराबाहेर पडाल तेव्हा सनस्क्रीन लावण्यास विसरू नका. तसेच आपला चेहरा झाकण्यासाठी स्कार्फचा वापर करा.

चेहरा उजळण्यासाठी चंदन पावडर खूप प्रभावी आहे. यासाठी 1 चमचा चंदन पावडर घ्या, त्यामध्ये चिमूटभर हळद आणि बदाम तेलाचे 4 थेंब मिसळा.

यानंतर हे मिश्रण हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्याला पुरेसे पोषण मिळते आणि चेहऱ्यावरील काळे डाग दूर होण्यास मदत मिळते.

आपल्याला चेहरा उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: फार्मइजी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *