- इन्फोमराठी

हापूस आंबा ओळखायचा कसा? आणि त्याचे औषधी गुणधर्म

हापूस ही एक आंब्याची जात आहे. हापूस आंबा त्याच्या उत्तम स्वाद व अप्रतीम गोडीसाठी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी आणि देवगड परिसरातील हापूस जगप्रसिद्ध आहे. अफोन्सो दि आल्बुकर्क या पोर्तुगीज दर्यावर्दी वरुन या आंब्याला अल्फान्सो हे नाव मिळाले. याचा अपभ्रंश होऊन भारतीय भाषांमध्ये याला हापूस असे म्हणतात.

हापूस आंबा ओळखायचा कसा? आतील रंग:- रत्नागिरी हापूस हा कापल्यावर केशरी दिसतो. पिवळा दिसत असेल तर तो रत्नागिरी हापूस असण्याची शक्यता कमी आहे.

सुगंध:- रत्नागिरी हापूसच्या देठाला सुवास येतो इतर आंब्यांना तुलनेत सुगंध खूप कमी येतो. रत्नागिरी हापूस तयार असेल तर सुरकुत्या आणि देठाकडे सुगंध येतो. रत्नागिरी हापूसची पेटी उघल्यावर प्रचंड घमघमाट सुटतो.

आकार:- रत्नागिरी हापूस खालून गोलाकार असतो. इतर हापूस खालून टोकदर असतात. खरेदी करताना मध्यम आकाराचे घेतलेले उत्तम.

साल :- आंब्याच्या सालीवरून देखील तुम्ही रत्नागिरी हापूस ओळखु शकता. रत्नागिरीची साल हि पातळ असते. इतर आंब्यांची साल जाड असते.

बाहेरील रंग:- केमिकल विरहित रत्नागिरी हापूस हा हिरवट पिवळा किंवा पिवळा असतो. स्पर्श:- आतमध्ये तयार होण्याची प्रक्रिया चालू असल्यामुळे, पेटी उघडल्यावर रत्नागिरी हापूस थोडा हाताला उबदार लागतो (बाहेरील तापमान आणि हापूस कसे ठेवलेत यावर पण उबदारपणा अवलंबून आहे.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपला लाडका रत्नागिरी हापूस हा चवीला अत्यंत गोड असतो. रत्नागिरी हापूस खाताना हाच फळांचा राजा हि भावना एकदा तरी मनात येतेच. हापूस आंब्याला भौगोलिक निर्देशांकासाठी तत्वता मान्यता मिळाली आहे.

देवगड हापूस आंबा व रत्नागिरी हापूस आंबा असे दोन स्वतंत्र भौगोलिक निर्देशांक हापूस आंब्याला बहाल करण्यात आले आहे. आता बघू याचे औषधी गुणधर्म

आंब्याच्या गरात थायमीन, नायसिन, रिबोफ्लेवीन, पायरीडॉक्सीन असतं. तर खनिजांपैकी कॅल्शियम, तांब, लोह, मॅग्नेशियम, मॅगनीज आणि जस्त अधिक प्रमाणात असतं.

कोयीचा गर काढून चावून खाल्ल्यावर अजीर्ण, पोटदुखी, जुलाब आदी विकारांवर आराम मिळतो.  कोयीचे वाळलेले तुकडे चावून खाल्ल्यास आवेचे जंत नष्ट होतात. ज्यांना गाडी, बस किंवा रेल्वेतून प्रवास करताना उलटी होते त्यांनी प्रवासादरम्यान आंब्याची पानं चघळावीत.

केसांत कोंडा किंवा खाज येत असेल त्यांनी आंब्याचा मोहोर, खोबरेल तेल आणि थोडं पाणी उकळून ते तेल टाळूला लावावं. साल चघळल्याने दात बळकट होतात. आंब्याची पानं सकाळी उठून चघळल्याने हिरडया मजबूत होतात. तसंच दातातून येणारं रक्त थांबतं.

नाकातून रक्त येणे, संडासवाटे रक्त जाणे, डोळ्यांची आग होणे, फुप्फुसे, आतडी, गर्भाशयातून रक्त वाहणे, अंगावरून पांढरं जाणं अशा रक्तपित्ताचा त्रास असलेल्यांनी आंब्याच्या आंतरसालीचं चूर्ण किंवा काढा सेवन करावा. आराम पडतो.

आंब्याची पानं चार कप पाण्यात उकळून ते पाणी एक कपभर आटवावं. हे पाणी गाळून बाटलीत ठेवावं. आणि डोळ्यांमध्ये ड्रॉप्स म्हणून वापरावं. म्हणजे डोळ्यांतून वारंवार पाणी येणे, सूज येणे, धूसर दिसणे, डोळे थकणे, रांजणवाडी आदी विकारांवर हे थेंब डोळ्यांत घातल्यास आराम पडतो.

कोवळ्या पानांचा लेप करून त्वचाविकारांवर लावल्यास आराम पडतो. आंब्याच्या कोयीचं चूर्ण मुरगळणे, लचकणे, सूज येणे या समस्यांवरही गुणकारी आहे.

आंब्यात चरबी, सोडियम आणि कोलेस्टेरॉल नसतं. तसंच जीवनसत्त्व ए, बी, सी, ई, आणि केचं प्रमाण असतं. बी जीवनसत्त्व आपल्या शरीरात साठवून ठेवलं जात असल्याने सीझनमध्ये खाल्लेल्या आंब्यापासून त्याची साठवण शरीरात केली जाते. आंब्याच्या रेषायुक्त तंतूमध्ये डाएटरी फायबर्सचं प्रमाण अधिक असतं. म्हणूनच आंबा चोखून आणि रेषांसकट खावा.

अवीट गोडीच्या या फळाला ‘कोकणचा राजा’ असं म्हणतात. असं असलं तरी आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे सांगता येत नाही. दक्षिण अणि दक्षिण पूर्व आशियामध्ये मोठया प्रमाणात जैववैविध्य पाहता इथेच उगम झाल्याचं मानण्यात येतं.

आपल्याला हापूस आंबा ओळखायचा कसा हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *