- आरोग्य

केसदाट करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

केस गळती या समस्येने बऱ्याच महिला हैराण झालेल्या आपल्याला दिसत असतील. लांबसडक आणि चमकदार केस हे प्रत्येक महिलेच्या सौंदर्याचे एक वेगळे वैशिष्ट असते. केस दाट न होणे ही महिलांची समस्या असते.

केस लांब होतात परंतु केसांमध्ये दाटपणा येत नाही. केस घनदाट, मजबूत आणि लांब करण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत. चला तर मग पाहूया काय आहेत ते घरगुती उपाय.

केसांचे आरोग्य चांगले असणे केसांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. आपण जर योग्य आहार घेतला तर केस लांब आणि दाट होतात.

त्यासाठी जंकफूड, फास्टफूड खाणे टाळावे. आहारामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि प्रोटिन्सयुक्त पदार्थांचा समावेश करावा. त्यामुळे केसांना मजबुती प्राप्त होऊन केस दाट होतील.

केस दाट होण्यासाठी सर्वात रामबाण उपाय म्हणजे खोबरेल तेल. रोज रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल कोमट करा आणि केसांच्या मुळांना लावा. सकाळी आंघोळ करताना केसांना शाम्पू न लावता केस तसेच धुवा. काही दिवसातच तुम्हाला तुमचे केस दाट दिसतील.

केस दाट करण्यासाठी 2 चमचे मेथीचे दाणे एका कप पाण्यात रात्रभर भिजवा. सकाळी मिक्सर मध्ये बारीक  पेस्ट करून घ्या. त्यानंतर हि पेस्ट केसांच्या मुळावर लावा अर्धा तास राहूद्या नंतर केस धुऊन टाका. असे आठवड्यातून एकदा केल्याने काही दिवसात आपले केस चमकदार आणि दाट होतील.

 कांद्याचा रस लावणे केसांच्या दाटपणासाठी चांगले असते. केसांच्या मुळांवर कांद्याचा रस लावा. वीस मिनिटानंतर केस कोमट पाण्याने धुवा. त्यामुळे केस गळणे कमी होते आणि केस दाट होतात.

कोरफडीचा गर हा केसांना दाट बनवतो. तसेच केसांमध्ये एक वेगळी चमक येते. तुम्ही आठवड्यातून दोन वेळा केसांना कोरफडीचा गर लावल्यास दहा ते वीस दिवसांमध्ये तुमचे केस दाट झालेले तुम्हाला नक्की दिसतील.

केस दाट होण्यासाठी आवळा ज्युस लावणे उपयुक्त ठरते. एक चमचा  आवळा ज्यूस खोबरेल तेलामध्ये मिक्स करून केस धुताना लावल्यास केस दाट होतात आणि केसांना चमक येते. त्याचबरोबर केस गळणे कमी होते.

केस दाट होण्यासाठी आठवड्यातून २ वेळा कोमट नारळाच्या तेलाने मालिश करा गरम तेलाने मालिश केल्याने केस केवळ मऊ राहत नाहीत तर नारळाच्या तेलामधील पोषकतत्व केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतात. डोक्यात बोटांनी हालचाल केल्यामुळे डोक्यात रक्ताचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे केसांच्या मुळांची ताकद वाढण्यास मदत मिळते. 

आपल्याला ताक पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेअल्थ लाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *