immunity
- आरोग्य

प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी सकाळच्या नाश्त्या मध्ये या गोष्टी खा

तुमच्या आरोग्याला साजेसा योग्य तो नाश्ता निवडून दिवसाच्या महत्त्वाच्या खाण्याची सुरुवात करा. नाश्ता हा दिवसभर लागणाऱ्या ऊर्जेसाठी असणारा महत्त्वाचा स्त्रोत आहे. दिवसभर ताजतवानं राहायचं असेल तर दररोज नाश्ता केला पाहिजे.

आहारतज्ञांच्या मते पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने अनेक आजार तर दूर होतातच त्याबरोबर आपली प्रतिकारशक्ती देखील वाढविण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया अशाच काही पदार्थांविषयी ज्याचे सकाळी सेवन केल्याने आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळेल.

सकाळच्या नाश्त्यात मुठभर शेंगदाणे गूळाचा छोटा खडा खाल्ल्याने आपल्याला भरपूर प्रथिने आणि कॅल्शियम मिळेल गुळामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने अशक्तपणा असलेल्यांनी गुळ आणि शेंगदाणे खाले पाहीजेत. त्या बरोबरच गुळ आणि शेंगदाणे दात आणि हाडांसाठीही फायदेशीर असतात.

शेंगदाणे आणि गुळ खाण्यामुळे शरीरातील रक्ताची कमी दूर होते. याच सोबत शरीराला उर्जा आणि स्फूर्ती मिळते. तसेच गुळामुळे पोटासंबंधी इतर समस्याही दूर होतात. गुळाचा सेवन केल्याने पोटात गॅस होत नाही आणि पचन क्रिया देखील सुरळीत राहते.

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हिरव्या ताज्या भाज्यांचे सलाद खा. यामध्ये तुम्ही पालक , कोबी , चूका , मेथी अश्या भाज्यांचा समावेश करू शकता.

सकाळच्या नाश्त्यात एक वाटी मोड आलेले कडधान्य (स्प्राउट्स) खाल्ल्यास दिवसभर पुरेल इतकी ऊर्जा आणि पोषण मिळते. मोड आलेल्या कडधान्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट असतात. मोड आलेल्या कडधान्याचा आहारात समावेश केल्याने आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते.

सकाळच्या नाश्त्यात गाजर, बीट, काकडी, टोमॅटो, खरबूज, पपई किंवा आपल्याकडे उपलब्ध फळांचे सलाद खा. दूध प्या असे केल्याने प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होइल. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते कारण शरीर सुदृढ राहण्यासाठी आवश्यक प्रोटीन, कॅलशियम आणि ओमेगा ३ हे घटक अंड्यात भरपूर प्रमाणात असतात. ही सर्व पोषक तत्वे आपल्या शरीरासाठी गरजेची असतात.

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपलब्ध असल्यास आवळ्याचा आपल्या आहारात समावेश करा शक्य झाल्यास आवळ्याचा ज्यूस प्या यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते. 

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्या सकाळच्या चहामध्ये आल्याचा समावेश करा. आले अँटीऑक्सिडेंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मयुक्त असते. तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते.

आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. आल्याचा समावेश केल्याने अन्नपचन चांगले होते. आपल्या सकाळच्या चहामध्ये आपण आल्याच्या ताजे काप घालू शकता. आले आपल्या चहाची चव तसेच सुगंध वाढवेल.

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी संत्री, मोसंबी खा. लिंबू वर्गीय फळामध्ये मोठ्या प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात आपल्याकडे उपलब्ध असेल तर सफरचंद खाऊ शकता.

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये आपल्याकडे घरात उपलब्ध असेलेला सुकामेवा म्हणजेच अंजीर, काजू, बादाम, मनुके या गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात खा. सुक्या मेव्यामध्ये शरीर सुदृढ राहण्यासाठी आवश्यक असणारे सर्व घटक असतात. नाश्ता हा दिवसभर लागणाऱ्या ऊर्जेसाठी असणारा महत्त्वाचा स्त्रोत तेव्हा तो कधीही टाळू नका.

आपल्याला ही यादी कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: फूड एन डी टी व्ही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *