- आरोग्य

“तळहाताच्या साली” जात असल्यास करा हे घरगुती उपाय

ऋतू बदलल्यावर काही लोकांच्या हाताची त्वचा निघू लागते. या काही घरगुती उपायांनी आपण या समस्येपासून सुटका मिळवू शकता. हाताच्या साली जाणे ही समस्या शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे सुद्धा होऊ शकते.

आपल्या हि हाताची साल जात असेल तर आपण भरपूर पाणी प्यायची सवय लावा. पाण्यामुळे शरीर हायट्रेड राहण्यास मदत मिळेल. परिणामी शरीराचे डिटॉक्सिकेशन देखील होईल आणि हाताच्या साली जाणार नाहीत.

हाताची साल जात असेल तर रोज झोपण्यापूर्वी हातांना कोरफड जेलने मालिश करा. सकाळी उठल्यावर हात कोमट पाण्याने धुवा. असे केल्याने आपल्या हाताची त्वचा कोमल होईल.

केळी हे एक चांगले मॉईश्चराईजर आहे. हाताची साल जात असल्यास एक चांगली पिकलेली केळी आपल्या हातावर चांगल्या प्रकारे चोळा. काही वेळ राहूद्या नंतर धुऊन टाका. आपले हात नरम होतील.

हाताची साल जात असल्यास त्यावर ग्लिसरीन लावल्याने हाताची त्वचा नरम होण्यास मदत मिळेल. हाताची साल जात असेल तर आपले हात 10 मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा. असे केल्याने हाताची त्वचा मऊ होण्यास मदत मिळेल.

रात्री झोपण्यापूर्वी हाताना बदाम तेल लावा. बदाम तेलामुळे त्वचा मऊ होते. हाताची साल जात असेल तर त्यावर आपण नारळाचं दूध लावल्याने हि आपली त्वचा नरम होईल.

यासाठी एक ओला नारळ मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. वस्त्रगाळ पद्धतीने नारळाचे काढा. रात्री झोपण्याआधी हे आपल्या तळहातावर लावा.

सकाळी हात धुऊन टाका. नारळाचे दूध त्वचेत खोलवर जाऊन मॉईश्चराईज करून पोषण देत ज्यामुळे आपली त्वचा नरम होण्यास मदत मिळते.

हाताची साल जाऊ नये यासाठी चण्याचे पीठ, दही आणि हळद एकत्र करून पेस्ट बनवा आणि 20 मिनिटांसाठी ही पेस्ट आपल्या हातावर लावा. नंतर हात थोडेसे चोळा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनवेळा हा उपाय करा.

दूधावरील सायसुद्धा कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त आहे. दूधावरील सायीमध्ये स्निग्धता असल्यामुळे तळहाताचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होईल.

यासाठी रात्री झोपण्याआधी दुधावरील साय आपल्या तळहातावर लावा.  रात्रभर राहूद्या सकाळी कोमट पाण्याने धुऊन टाका. आपले हात जास्तच कोरडे पडले असल्यास साबणाचा वापर पूर्णपणे बंद करा.

आपल्याला तळहाताच्या साली जात असल्यास करा हे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: इंडिया.कॉम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *