- आरोग्य

उन्हाळ्यात चेहरा फ्रेश दिसण्यासाठी करा हे घरगुती उपाय

आपण आपला चेहरा नेहमी सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपला चेहरा सुंदर दिसावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेत असतो. वातावरणातील धूळ, प्रदूषण तसेच उन्हाचा आपल्या चेहऱ्यावरील त्वचेवर परिणाम होऊन आपला चेहरा निस्तेज दिसू लागतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत चेहरा फ्रेश दिसण्यासाठी घरगुती उपाय.

उन्हामुळे आपला चेहरा तेलकट दिसत असल्यास असल्यास एक चमचा मध हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटे राहूद्या नंतर चेहरा धुऊन टाका. असे केल्याने चेहऱ्यावरील तेलकट पणा जाऊन चेहरा चमकदार दिसू लागेल.

चेहऱ्याची त्वचा टवटवीत राहण्यासाठी थोड्या-थोड्या वेळानं चेहरा पाण्याने धुवा. चेहरा धुताना शक्यतो साबण लावू नका, साबणामुळे चेहऱ्याची त्वचा कोरडी पडू शकते.

उन्हामध्ये बाहेर गेल्यावर आपला चेहरा काळपट दिसू लागतो. अशा वेळी आपण 2 चमचे मुलतानी माती घ्या त्यामध्ये थोडेसे गुलाब जल मिसळून एकजीव करून आपल्या चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर चेहरा धुऊन टाका. असे केल्याने चेह-याचा रंग उजळण्यास मदत मिळेल.

मानसिक तणाव, जागरण केल्याने डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात. डोळ्याखाली असणारी काळी वर्तुळे कमी करण्यासाठी कच्च्या बटाट्याच्या चकत्या करून हलक्या हाताने आपल्या डोळ्यांच्या खालच्या भागावर चोळा असे केल्याने आपल्या डोळ्याखाली असणारी काळी वर्तुळे नाहीशी होण्यास मदत मिळेल.

उन्हामुळे चेहरा काळपट पडला असेल तर त्यावर रात्री झोपण्याआधी त्यावर कोरफडाचा गर लावा सकाळी पाण्याने धुऊन टाका. आपला चेहरा परत पूर्वी सारखा होईल. तसेच चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर ते सुद्धा नाहीशे होतील.

चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असतील तर एक पिकलेली केळी मॅश करून चेहऱ्यावर चोळा. काही वेळ राहूद्या नंतर पाण्याने धुऊन टाका आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळेल.

चेहरा फ्रेश दिसण्यासाठी आपण दिवसातून दोन वेळा आंघोळ करू शकता. दिवसातून दोन वेळा आंघोळ केल्याने आपले शरीर थंड राहील. आंघोळीची सुरुवात थोड्या कोमट पाण्याने करा नंतर थंड पाणी वापरा.

चेहरा फ्रेश दिसण्यासाठी तसेच त्वचेमधील छिद्र मोकळी होण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी वाफ घ्या. त्वचा तजेलदार होण्यासाठी पुरेशी झोप घेणं अत्यंत गरजेचं असत. त्यामुळे रात्री जागरण न करता झोप घ्या.

आपल्याला उन्हाळ्यात चेहरा फ्रेश दिसण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: इंडिया.कॉम, स्किनक्राफ्ट ब्लॉग आणि स्टाईलक्रेझ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *