- आरोग्य

रताळे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

उपवासाच्या दिवशी आपण आवर्जुन रताळे बाजारातून आणत असतो. रताळे कच्चे, उकडून, भाजून खाता येते. आज जाणुन घेउयात रताळे खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए सारख्या कॅरोटीनोइड्स सारखे शरीराला आवश्यक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात.

रताळे व्हिटॅमिन बी 6 चा चांगला स्रोत असतात. रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आढळते. जे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. आणि यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

रताळ्यांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रताळे पचायला हलके असतात. रताळ्यामध्ये कॅल्शिअम असते, कॅल्शिअममुळे हाडांना मजबुती मिळते.

रताळे लोहाचा चांगला स्रोत असतात. रताळे खाल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. रताळ्यामध्ये फॉलिक एसीड असते. ते शरीराच्या विकासास सहाय्य करते. गर्भवती महिलांनी याचे सेवन केल्याने फॉलिक एसीड वाढण्यास मदत होईल.

डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे आली असल्यास उकडलेले रताळे त्यावर काही दिवस लावल्यास काळी वर्तुळे कमी होण्यास मदत मिळेल. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात असते. रताळे खाल्याने हाडे बळकट होतात तसेच दात मजबूत होतात.

रताळ्यामध्ये बीटा कॅरोटिन असते. जे केसांच्या वाढीसाठीही चांगले असते. रताळे खाल्याने फुफ्फुसात जमा झालेले कफ निघण्यास मदत मिळते. रताळे पचनास हलके असल्याने लहान मुलाना रताळे उकडून खायला देता येतात.

रताळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. जे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. जर आपल्याला  वजन वाढवायचे असेल तर आपण आपल्या आहारात रताळ्याचा समावेश करू शकता.

आपल्याला रताळे खाण्याचे आरोग्यदायी फायदे  हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेल्थलाईन आणि वेब एम डी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *