दररोज अर्धा तास चालणे हा शरीर आरोग्यसंपन्न ठेवण्याचा साधा, सोपा, बिनखर्चीक उपाय आहे. सकाळी वीस ते तीस मिनिटे न थांबता चालणे आरोग्यासाठी उत्तम आहे. चालणे हा कोणत्याही साहित्या शिवाय करता येणारा व्यायाम आहे.
शरीर तंदुरूस्त आणि चपळ ठेवण्यासाठी सगळ्यात सोपा व्यायाम प्रकार म्हणजेच चालणे. नियमित चालण्याने एकावेळी शारीरिक आणि मानसिक व्यायाम होत असतो. चालण्याने काय फायदा होतो? चला तर जाणून घेऊयात सकाळी ३० मिनिटे चालण्याचे आरोग्यदायी फायदे.
सकाळी चालण्यामुळे शुद्ध वातावरणातील ऑक्सीजनचा शरीराला पुरवठा होतो. फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते. हृदयाचे कार्य व्यवस्थित सुरू राहते, रक्ताभिसरण सुधारते व रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
शरीराला अधिक प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो. चालल्याने रक्तातील पांढऱ्या रक्तपेशी वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. नियमित सकाळी चालल्याने मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
वाढत्या वयात आपले स्नायू कमजोर होतात. चालण्याने या स्नायूमध्ये अधिक ताकद येते. हाडांमधील ठिसूळपणा कमी होतो. सकाळी चालल्याने हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व कोवळ्या उन्हातून मिळते.
नियमित सकाळी चालणे वजन संतुलित ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. चालण्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि मलबद्धतेसारखे पचनाचे विकार दूर होतात. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते.
चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत होते. चालण्यामुळे झोपही चांगली लागते. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते. चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते. सतत काम करून आलेला थकवा नाहीसा होण्यास मदत मिळते.
नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते. नियमित चालण्याची सवय असणाऱ्यांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी असते.
नियमित चालण्यामुळे पायाचे स्नायू मजबूत होतात एकट्याने चालणे कंटाळवाणे वाटत असल्यास मित्र मैत्रीणीसोबत चालण्यास सुरू करा.
आपल्याला ताक पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: बेटर हेल्थ