- आरोग्य

घोरणे थांबवण्यासाठी प्रभावी उपाय

इतरांची झोपमोड करणारा आजार म्हणजे घोरणे आणि ज्याला हा जडलाय त्याला माहीतच नसते .काही लोकांना झोपेत घोरण्याची सवय असते. ह्या सवयीचा त्यांना स्वतःला काही अपाय होत नसला तरी इतरांची झोप मात्र यामुळे खराब होऊ शकते. मात्र झोपेत घोरणे हि सवय नसून समस्या आहे आणि त्यापासून सुटकारा हि मिळू शकतो.

घोरणे म्हणजे झोपेत जीभ, टाळू आणि पडजीभ, इ. स्नायू सैल पडल्याने हवेच्या मार्गातील कंपनाने होणारा आवाज आहे. मात्र हा हवेच्या मार्गात अडथळा असल्याने झोपेत शरीरावर याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

म्हणूनच याचे वैद्यकीय महत्त्व आहे. हवेच्या अडथळयाच्या प्रमाणानुसार शरीरातील रक्तातल्या प्राणवायूचे प्रमाण निम्म्याच्या खाली जाऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. म्हणूनच आज जाणून घेऊयात घोरणे थांबवण्यासाठी उपाय.

पाणी अथवा दुधातून मध घेतल्यामुळे तुमचा श्वसनमार्ग मोकळा होतो. जर आपण घोरत असाल तर दररोज हा उपाय जरूर करा. ज्यामुळे तुमचा घोरण्याचा त्रास कमी होऊ शकतो.

रात्री झोपताना पाठीखाली उशी घ्यावी, मान खाली टाकावी व दोन्ही नाकपुडीत थोडेसे  शतावरी तेल अथवा ज्येष्ठमध तेल टाकावे. घोरणे कमी होईल.

सकाळी गरम पाण्यात १/२ चमचा तिळाचे तेल टाकून पाच मिनिटे गुळण्या कराव्यात. असे केल्याने घोरणे कमी होते. पंखा किंवा एसीची सरळ हवा लागल्याने श्वास नलिका आकसतात. त्यामुळे पंखा किंवा एसी खाली झोपू नका.

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे नाक आणि गळ्यामध्ये कफ वाढतो. ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण येते. दिवसभर ३-४ लिटर पाणी प्या. जेणेकरून शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे नाक आणि गळ्यामध्ये कफ वाढणार नाही.

घोरणे थांबवण्यासाठी रात्री झोपण्याआधी एक कप गरम पाणी घ्या. त्यामध्ये 10 पुदीण्याची पाने घाला. आणि थोडेसे थंड होऊ द्या. हे पाणी कोमट झाल्यावर प्या. काही दिवस हा उपाय केल्याने आपली घोरण्याची समस्या कमी होईल.

घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी कपालभाति आणि प्राणायम फायदेशीर आहे. नियमित पणे कपालभाति केल्याने घोरण्याची समस्या कमी होऊ शकते. 

रात्रीच्या वेळी जास्त खाणे टाळा. झोपण्याआधी कफ वाढवणारे पदार्थ, जसे की दुध, ऑयली फूड, चॉकलेट किंवा गोड खाऊ नका.

घोरण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला चांगली आणि शांत झोप घेणे गरजेचे आहे. झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपल्या शरीरात मेलाटोनिनचे प्रमाण चांगले असणे गरजेचे आहे.

शरीरात मेलाटोनिनचे प्रमाण चांगले होण्यासाठी आपण आहारात अननस, संत्री आणि केळी या गोष्टींचा समावेश करा. यामधून आपल्याला मुबलक प्रमाणात मेलाटोनिन मिळेल. आणि आपल्याला शांत आणि चांगली झोप लागेल.

घोरण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा दालचिनी पावडर मिसळून प्या. नियमित असे केल्याने सेवन केल्याने आपली घोरण्याची समस्या कमी होईल.

जर रक्त दाब सामान्यांपेक्षा जास्त असेल तर यामुळे घोरण्याची समस्या होऊ शकते. रक्त दाब नियंत्रणात असावा. घोरणे टाळण्यासाठी वजनावर नियंत्रण असणे खूप आवश्यक आहे. जास्त वजन असल्याने घोरण्याची समस्या होते.

म्हणून आपले वजन नियंत्रित करा. २-३ पाकळ्या लसूण मोहरीच्या तेलात टाकून गरम करा आणि या तेलाने छातीची मालिश करा. असे केल्याने फायदा होईल.

रोज झोपण्याआधी एक चमचा मध प्यायल्याने गळ्याच्या रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. तसेच यामुळे घोरण्याची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने, वाहिन्यांमधील सूज बरी होते आणि घोरणे बंद होते. गार पाणी प्यायल्याने किंवा पदार्थ खाल्ल्याने घशाच्या वाहिन्या आकसतात. ज्यामुळे घोरण्याची समस्या होते. म्हणूनच रात्री झोपण्याआधी गार पाणी पिणे टाळा

पाठीवर झोपणे चांगले मानले जाते. मात्र खूप कमी लोकांना माहित आहे की, पाठीवर झोपल्याने घोरण्याची शक्यता वाढते. कारण पाठीवर झोपल्याने तुमचा टाळू आणि जीभ गळ्यातील वरच्या भागात येतात.

त्यामुळे मोठ्या आवाजात ध्वनी उत्पन्न होतो आणि तोच आवाज घोरण्यात बदलतो. यामुळेच सरळ पाठीवर झोपण्याऐवजी कुशीवर झोपा.

झोपण्याची बाजू बदला. पाठ किंवा पोटावर झोपण्याऐवजी डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. वरील उपायानी जर घोरण्याचा त्रास कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आपल्याला घोरणे थांबवण्यासाठी उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेल्थलाईन आणि टाइम्स नाऊ न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *