- आरोग्य

आजारपणामुळे तोंडाची चव गेली असेल तर करा हे घरगुती उपाय

ताप आल्यानंतर जिभेची चव निघून जाते. जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा आपल्याला कोणताही अन्नपदार्थ खावा अस वाटत नाही. त्यामुळे आपण कमजोर होत जातो. वारंवार गोळ्या खाल्याने जीभेची चव नाहीशी होत जाते. अशा वेळी आपण  असे काही उपाय करू शकता ज्यामुळे जिभेला चव येईल. चला तर मग जाणून घेऊया हे उपाय.

जिभेला चव येण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे गुळ खाणे. गुळ खाल्ल्यामुळे तोंडाला काही क्षणातच चव येईल. गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. जेव्हा पण आपण आजारी असाल तेव्हा लहानसा गुळाचा खडा चघळा. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होईल आणि तोंडाला चव येईल.

तोंडाची  चव परत येण्यासाठी आल्याचा तुकडा चघळा आल्याचा तुकडा त्यातून येणाऱ्या रसामुळे जीभेचे टेस्ट बड्स सक्रिय होतील आणि आपल्या तोंडाला चव येईल.

नियमित पाणी पिल्यामुळे जीभ कोरडी पडत नाही. बऱ्याच वेळा आपण तहान लागल्यानंतर पाणी पितो. परंतु दिवसभरामध्ये शरीरामध्ये योग्य पाण्याचे प्रमाण जाणे गरजेचे असते. तहान लागल्यावर एक एक घोट करत पाणी प्यायल्यास जिभेची चव लवकर परत येईल.

जिभेची चव परत येण्यासाठी आपल्या आवडीचे पदार्थ खा. आपल्या आहारात आवडीच्या पदार्थानाचा समावेश केल्याने खाण्याची इच्छा वाढते.

तोंडाची  चव परत येण्यासाठी लसणाच्या 1 ते 2 पाकळ्या चघळा. लसणामध्ये अँटी इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे सर्दी, खोकला आणि ताप कमी होण्यास मदत होते. लसणामुळे तोंडाची  चव पुर्वव्रत होण्यास मदत मिळते.

जीभेची चव येण्यासाठी पूर्वीपासून काकवी आणि भाकरी खाण्यासाठी दिले जाते. काकवीमुळे  पोटामध्ये भूक वाढते. तसेच आपल्या जीभेची चव येण्यासाठी मदत करते. काकवी खाणे आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त आहे.

मद्य’पान केल्याने जिभेचे चव निघून जाते. मद्यपान करणे आपल्या शरीरासाठी फार घातक असते. मद्यपान केल्याने जिभेची चव जाते. त्यामुळे मद्यपान करणे सोडून द्या.

कधी कधी एकाच प्रकारचे जेवण केल्याने सुद्धा आपल्याला अन्नाची चव लागत नाही यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नपदार्थांचा समावेश आपल्या आहारात करा.

जीभ जेव्हा कोरडी पडते तेव्हा जीभेची चव नाहीशी होते. त्यामुळे नियमित जिभेवर लाळ ठेवण्यासाठी तुम्ही आवळा खाऊ शकता. यामुळे तुमच्या जिभेवर  लाळ राहील आणि जीभेची चव जाणार नाही. आवळा सुपारी खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते.

भूक नसताना जबरदस्तीने आपण जेवायला घेतल तर आपल्याला अन्नाची चव लागत नाही. त्यामुळे भूक लागल्यानंतरच जेवण करणे गरजेच आहे.

आपल्याला आजारपणामुळे तोंडाची चव गेली असेल तर करा हे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *