मुलींचे केस सहसा लांब असतात. केसांची योग्य निघा राखली नाही तर उवा होतात. म्हणून केसांना आठवड्यातून दोन वेळा स्वच्छ धुणे आवश्यक आहे. केसांना तेल लावून केसांची योग्य काळजी घेतल्यास उवा होण्याची समस्या निर्माण होणार नाही.
उवा झाल्यामुळे डोक्याला खूप खाज सुटते. यासाठी उवा झाल्यास काय करावे हे माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. आज जाणून घेऊयात डोक्यात उवा झाल्यास आपण कोण कोणत्या घरगुती उपायांची मदत घेऊ शकतो.
केसांमध्ये उवा झाल्यास त्यावर रामबाण उपाय म्हणजे लसूण घ्या आणि लसणीचा रस लिंबाच्या रसात मिसळा. रात्रभर हे मिश्रण डोक्याला लावून सकाळी केस स्वच्छ धुतल्यास केसांमधील उवा निघून जातात.
डोक्यातील उवा घालवण्यासाठी 2 ते 3 तास केसांना कांद्याचा रस लावून ठेवा. त्यामुळे उवा मरतात. कांदा हा केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे कांद्याचा रस केसांना लावा. स्वच्छ पाण्याने केस धुवून कंगव्याने केस विंचरल्यास उवा मरतील.
डोक्यातील उवा घालवण्यासाठी मुठभर कडुलिंबाची पाने एक ग्लास पाण्यात उकळून घ्या. थंड झाल्यावर त्या पाण्याने केस धुवा. आठवडा भर हा उपाय केल्याने आपल्या डोक्यातील उवा काही दिवसातच निघून जातील.
केसांमध्ये वारंवार उवा होत असतील तर त्यावर एक चांगला उपाय म्हणजे खोबरेल तेलामध्ये कापूर उकळून हे मिश्रण थंड करा. त्यानंतर केसांना लावा. सकाळी उठल्यावर केस स्वच्छ पाण्याने धुवा. उवा निघून जातील.
डोक्यातील उवा घालवण्यासाठी तुम्ही सीताफळाची पाने अथवा बियांचा रस काढून लावू शकता. त्यामुळे केसांमधील उवा निघून जातात. सीताफळाची कोवळी पाने काढून या पानांचा रस डोक्याला लावल्यास उवा काही दिवसातच निघून जातील.
आपल्याला डोक्यात उवा झाल्यास सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेल्थलाईन