- आरोग्य

हाडांची झीज भरून काढण्यासाठी सोपे घरगुती उपाय

जसजसे आपले वय वाढत जाते तसतशी आपली हाडे कमजोर होत जातात. तरुण वयात जास्त शारीरिक कष्ट केल्याने वयाच्या चाळीशीनंतर हाडांमध्ये मजबुती राहत नाही. हळूहळू हाडे कमजोर होतात.

यामागील मुख्य कारण म्हणजे शरीरात कॅल्शियमची कमतरता असणे. त्यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता होऊ देऊ नका. आज आपण हाडांची झीज भरून काढण्यासाठी कोणते उपाय करता येतात हे पाहणार आहोत.

हाडांची झीज भरून काढण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढवले पाहिजे. त्यासाठी योग्य आहार घेणे अतिशय महत्वाचे आहे. जर तुम्ही रोज एक ग्लास दूध प्यायलात तर हाडे मजबूत होतील. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाल्याने शरीराला मोठ्याप्रमाणात कॅल्शियम मिळते. त्यामुळे हाडे मजबूत राहतील.

दुधात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असत ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळेल. लहान मुलांना रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधामध्ये १ चमचा बदामाची पावडर मिसळून दिल्याने मुलांच्या हाडांची वाढ चांगल्याप्रकारे होते. आणि स्मरणशक्ती ही वाढण्यास मदत मिळते.

हाडांची झीज भरून काढण्यासाठी आहारात अंडी, मांस या पदार्थांचा समावेश करू शकता. तसेच तुम्ही रोज सीझनमध्ये येणारी फळे खाऊ शकता. त्यामुळे योग्य पोषक घटकांचा पुरवठा शरीराला होईल. हाडे ठिसूळ होणार नाही.

सकाळच्या कोवळ्या सुर्यप्रकाशात बसल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे हाडांची समस्या दूर करण्यासाठी कोवळा सूर्यप्रकाश महत्वाचा असतो. कोवळया उन्हामधून आपल्याला विटामिन डी चा पुरवठा होतो. हाडांना मजबूती येते.

हाडांची झीज भरून काढण्यासाठी आपल्या आहारात सोयाबीन वड्यांचा समावेश करा. सोयाबीनमध्ये कॅल्शियम हा घटक मोठ्या प्रमाणात असल्याने हाडांची झीज भरून येण्यास मदत मिळते.

हाडांची झीज भरून काढण्यासाठी नियमित किमान अर्ध्या तासासाठी व्यायाम करा. यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *