- आरोग्य

उन्हामुळे चेहरा काळा पडल्यास करा हे घरगुती उपाय

उन्हात फिरल्याने चेहरा काळा पडतो. ही एक सर्वसामान्य समस्या आहे. तेलकट त्वचा असणाऱ्यांना या समस्येला सामोरे जावे लागते. कारण उन्हामुळे तसेच प्रदूषित वातावरणामुळे तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर या वातावरणाचा जास्त परिणाम होतो. परिणामी त्यांची त्वचा काळी पडते. यासाठी काही घरगुती उपाय आहेत.

उन्हामुळे त्वचा काळी पडत असेल तर उन्हामध्ये जाण्याआधी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर  सन क्रीम लावा. त्यामुळे चेहऱ्याला प्रोटेक्शन मिळेल आणि तुमची त्वचा काळी पडणार नाही.

उन्हामुळे चेहरा काळा पडल्यास नारळाचे पाणी चेहऱ्यावर दिवसातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील काळपटपणा कमी होण्यास मदत होईल.

उन्हामुळे त्वचेला काळपटपणा प्राप्त झाला असेल तर यावर सर्वात रामबाण उपाय म्हणजे हळद आणि गुलाबजल यांचे मिश्रण एकत्र करा. त्यामध्ये एक चमचा हरभरा डाळीचे पीठ घालून हे मिश्रण काही काळ चेहऱ्यावर लावून ठेवा. थोड्या वेळाने चेहरा धुवा. चेहऱ्यावरील काळपटपणा निघून जाईल.

उन्हामुळे चेहऱ्यावर आलेला काळपटपणा कमी करण्यासाठी आपण  दही आणि मधाचा वापर करू शकता. दही आणि मधामध्ये सूर्य किरणांमुळे खराब झालेल्या त्वचेला बरे करण्यास सक्षम अँटीऑक्सिडेंट्स असतात. यासाठी सर्वप्रथम एका वाटीत थोडेसे दही घ्या त्यामध्ये 2 चमचे मध मिसळून हे मिश्रण हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावर लावा.

15 मिनिटे राहूद्या सुकल्यानंतर हातावर थोडेसे कोमट पाणी घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळा आणि धुऊन टाका. आपल्या चेहऱ्यावरील उन्हामुळे आलेला काळपटपणा निघून जाईल. 

उन्हामुळे चेहरा काळा पडल्यास बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून त्याची पेस्ट बनवून घ्या. चेहरा स्वच्छ धुवून ती पेस्ट चेहऱ्यावर १० मिनिटे लावा. नंतर धुऊन टाका. असे केल्याने आपला चेहरा परत पहिल्या सारखा दिसेल.

काळी झालेली त्वचा उजळण्यासाठी चंदन अतिशय उपयुक्त आहे. चंदनची पेस्ट गुलाबजलमध्ये मिसळून ही पेस्ट चेहऱ्याला  लावल्यास उन्हामुळे आलेला काळपटपणा त्वरित निघून जाईल. चंदनाध्ये असलेले गुणधर्म कांती उजळण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे चेहरा उजळतो.

उन्हामुळे आलेल्या काळपटपणा घालवण्यासाठी जायफळ आणि अनंतमुळ यांचे चूर्ण एकत्र करून दुधामध्ये मिसळून हि पेस्ट 15 मिनिटे चेहऱ्यावर  लावा. त्यामुळे काळपटपणा दूर होईल. तसेच कोरफडीचा गर चेहऱ्याला लावल्याने घाण निघून जाते. परिणामी आपला चेहरा उजळतो.

उन्हामुळे चेहरा काळा पडल्यास एक पिकलेली केळी थोड्या पाण्यात मिक्स करून घ्यावी. ते मिश्रण चेहऱ्यावर लावून २० मिनिटे ठेवा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. असे केल्याने आपला चेहरा परत पहिल्या सारखा दिसेल.

आपल्याला उन्हामुळे चेहरा काळा पडल्यास करा हे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: इंडिया टुडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *