- आरोग्य

चेहऱ्यावरील पिग्मेंटेशनचे डाग कमी करण्यासाठी घरगुती उपाय

प्रत्येक स्त्रीला सुंदर आणि डाग मुक्त चेहरा हवा असतो परंतु काही वेळा काही कारणांमुळे चेहऱ्यावर पिग्मेंटशनचे डाग येतात. पिग्मेंटशनचे डाग सहसा डोळ्याखाली आणि नाकाजवळ येतात. चेहऱ्यावर पिग्मेंटशनचे डाग येण्याची अनेक कारणे असू शकतात.

कधीकधी पोट अस्वस्थतेमुळे तर  कधीकधी हार्मोन्सच्या असंतुलनामुळे असे डाग चेहऱ्यावर येत असतात. पिग्मेंटशनचे डाग चेहऱ्यावर आल्याने आपला चेहरा खराब दिसू लागतो म्हणूनच आज आपण चेहऱ्यावरील पिग्मेंटशनचे डाग कमी करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

बटाटामध्ये अँटी पिग्मेंटेशन गुणधर्म असतात. पिग्मेंटशनचे डाग कमी करण्यासाठी 1 कच्चा बटाटा घ्या. सुरीच्या सहाय्याने त्याच्या बारीक चकत्या करा. अन चेहऱ्यावर ज्या ठिकाणी पिग्मेंटशनचे डाग आलेले आहेत.

त्या ठिकाणी हलक्या हाताने घासा. बटाट्याचा रस त्या डागावर 10 मिनिटे राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा असे केल्याने डाग लवकर नाहीसे होतील.

पपईमध्ये एक्सफोलाइटिंग घटक असतात, ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील पिग्मेंटशनचे डाग हि कमी होतात. यासाठी चांगल्या पिकलेल्या पपईचे काही तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यामध्ये 2 चमचे दूध आणि 1 चमचा मध मिसळून घ्या.

या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळून पेस्ट तयार झाल्यावर चेहऱ्यावर लावा, 20 मिनिटांनी चेहरा धुवा. असे केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील तसेच चेहऱ्यावरील पिग्मेंटशनचे डाग हि कमी होतील.

दह्यामध्ये लैक्टिक एसिड असते, जे त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. चेहऱ्यावरील पिग्मेंटशनच्या  डागापासून मुक्त होण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर दही लावा आणि 20 मिनिटे राहूद्या. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवा. असे केल्याने आपला चेहरा चमकदार दिसू लागेल आणि पिग्मेंटशनचे डाग हि कमी होतील.

चेहऱ्यावरील पिग्मेंटशनचे डाग कमी करण्यासाठी थोडी हळद आणि गुलाब पाणी घ्या. हळद आणि गुलाबाचे पाणी चांगले मिसळून घ्या. पेस्ट तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनी आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा. असे केल्याने पिग्मेंटशनचे डाग कमी होतील.

चेहऱ्यावरील पिग्मेंटशनचे डाग कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी थोड्याश्या दुधामध्ये बदामाची पावडर मिसळून ते मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. सकाळी झोपेतून उठल्यावर चेहरा धुऊन टाका. असे केल्याने डाग लवकर नाहीसे होतील.

चेहऱ्यावरील पिग्मेंटशनचे डाग कमी करण्यासाठी एक चांगला पिकलेला टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तयार झालेली पेस्ट हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावर लावा. साधारणपणे 20 मिनिटे राहूद्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. असे केल्याने आपला चेहरा चमकदार दिसू लागेल आणि पिग्मेंटशनचे डाग हि कमी होतील.

बऱ्याचदा आपला चेहरा तीव्र सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने पिग्मेंटशनचे डाग येत असतात. त्यामुळे आपण जेव्हा पण उन्हात बाहेर जाणार असाल त्यावेळी आपला चेहरा झाकून घ्या.

आपल्याला चेहऱ्यावरील पिग्मेंटशनचे डाग कमी करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *