- आरोग्य

पाठदुखीपासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपाय

बदलेली जीवनशैली व सतत एका जागेवर बसून काम करण्याच्या सवयीमुळे  आजकाल, पाठदुखीची समस्या बर्याआच लोकांमध्ये दिसून येते. बऱ्याच वेळा आपण पाठदुखीकडे दुर्लक्ष करतो, यामुळे पुढे ही समस्या मोठी रूप धारण करते.

पाठदुखीची अनेक कारणे असू शकतात. बराच वेळ बसून काम करण्याच्या सवयीमुळे , वृद्धत्वामुळे स्नायू आणि हाडे कमकुवत होऊ लागतात. वेदना होऊ लागते, आज जाणून घेऊयात पाठदुखीपासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपाय

आहारात पुरेश्या प्रमाणात दूध आणि दुधाच्या पासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश असुद्या शरीरातील कैल्शियम च्या कमीमुळे सुद्धा पाठ दुखु शकते.

शरीराच्या कोणत्याही भागामध्ये तीव्र वेदना होत असतील तर लसूण तेल लावून त्या भागाची मालिश करा. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.

आल्यामध्ये नैसर्गिक वेदना कमी करणारे घटक असतात. वेदना कमी होण्यासाठी एका ग्लास पाण्यात आल्याचे तुकडे उकळवून घ्या आणि नंतर ते थोडेसे थंड करा आणि त्यात मध घाला. या पाण्याचे सेवन केल्याने पाठीच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

पाठ दुखत असल्यास  आंघोळीच्या पाण्यात थोडेसे खडे मीठ टाकुन आंघोळ करा. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने स्नायु मोकळे होण्यास मदत मिळते. पाठ दुखीपासून आराम मिळतो.

मालिश आपल्या शरीराच्या अवयवांमध्ये चांगल्या रक्तप्रवाहासह स्नायूंना बळकट करण्यात मदत करते. ज्यामुळे आपल्याला वेदनापासून आराम मिळतो, मालिश करण्यासाठी आपण मोहरी, तीळ किंवा बदाम तेल वापरू शकता. करू शकता.

पाठ दुखत असल्यास बर्फाच्या पिशवीने त्या भागावर शेकवले तरी आराम मिळतो. पाठ दुखी होऊ नये यासाठी आपण रात्रभर पाण्यात भिजवलेले काळे तीळ सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास पाठ दुखीपासून आराम मिळतो.

ज्यांना नियमित पाठदुखीचा त्रास होत असेल त्यांनी 1 ग्लास दुधामध्ये 2 – 3 चमचे बदामाची पावडर घालून रात्री झोपण्या आधी प्या.  बदामांच्या दुधात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असत ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळेल. आणि पाठ दुखीच्या वेदनेपासून आराम मिळेल.

पाठ दुखी होऊ नये यासाठी एकाच स्थितीत बराच वेळ बसू नका. नियमित काही वेळाने बसण्याची स्थिती बदला, पाठ सरळ करा किंवा फिरून या. गाडी चालवताना पाठीला आधार मिळेल याप्रकारे सीट ठेवा. सकाळी लवकर उठून प्रसन्न वातावरणात योगा केल्याने आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळेल.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *