- आरोग्य

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्या हळद आणि कोमट पाणी

आपण कोमट पाण्याचे अनेक फायदे पाहिले आहेत. परंतु त्याच कोमट पाण्यामध्ये हळद टाकून प्यायल्यास त्याचे आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. हळदीमध्ये अनेक घटक असे असतात. जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.

कोमट पाण्यामध्ये हळद घालून प्यायल्यास आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींसाठी हळद आणि कोमट पाणी फार उपयुक्त आहे. आज आपण हळद आणि कोमट पाणी पिण्याचे फायदे पाहणार आहोत.

त्वचेसाठी वरदान असलेल्या हळदीचे सेवन कोमट पाण्यामध्ये टाकून केल्यास आपला रंग उजळण्यास मदत होते. त्वचेमध्ये असलेले विषारी घटक निघून जातात आणि त्वचा साफ होते. त्यामुळे कोमट पाण्यामध्ये हळद टाकून हे मिश्रण घेतल्यास आपला रंग उजळतो.

कोणताही संसर्गजन्य रोग आल्यास यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे कोमट पाण्यामध्ये हळद टाकून पिणे. यामुळे संसर्गातील रोग होण्याचा धोका कमी होतो. थंडीमध्ये होणारे आजार टाळण्यासाठी थंडीच्या दिवसात कोमट पाणी आणि हळद पिने आपल्या शरीराला फायदा होतो.

सकाळच्या वेळी कोमट पाण्यात थोडीशी हळद टाकून प्यायल्यास स्नायूंना मजबुती मिळते. तसेच सांधेदुखी आणि आर्थरायटिस यासारख्या आजारांचा धोका कमी होतो.

पोटाच्या आरोग्यासाठी हळद आणि कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे. हळद आणि कोमट पाणी पिल्यामुळे पचनशक्ती सुधारते. त्यामुळे पोटाचे अनेक आजार नाहीसे होतात. त्यामुळे कोमट पाणी आणि हळद घेणे पोटाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

आपल्याला बारीक बारीक गोष्टी लक्षात राहत नाहीत. त्यालाच स्मरणशक्ती कमी होणे असे म्हणतात. तुमची बुद्धी तल्लख होण्यासाठी तुम्ही रोज सकाळी कोमट पाणी आणि हळद या यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल.

योग्य प्रमाणात हळद आणि कोमट पाणी प्यायल्यास पोटावरील चरबी कमी होईल. यामध्ये असणाऱ्या कर्क्युमिन घटकामुळे अतिरिक्त चरबी कमी होते.

यकृताचे संरक्षण करण्यासाठी हळद आणि कोमट पाणी फायद्याचे आहे. हळद आपल्या यकृतामधील विषारी घटक नष्ट करतात. त्यामुळे यकृताचे संरक्षण होते. तुम्ही नियमित कोमट पाण्यामध्ये हळद टाकून पिल्यास तुमचे यकृत चांगले राहते.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. फूड एन डी टी व्ही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *