- आरोग्य

कांदा कापताना डोळ्यांना पाणी येऊ नये यासाठी घरगुती उपाय

कांदे कितीही महाग असले तरी कांद्याशिवाय भाजीला चांगली चव येत नाही. पण भाजीला कांद्याची चव देण्यासाठी कांदा चिरताना रडायला लागत. जेव्हा कांदा कापला जातो. तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी येते. डोळ्यांत जळजळ होते. अस का होत असेल बर चला तर जाणून घेउयात कांदा कापताना डोळ्यांना पाणी येऊ नये यासाठी घरगुती उपाय.

कांद्यामध्ये साइन-प्रोपेनेथियल-एस-ऑक्साईड नावाचे एक रसायन असत जे कांदा कापताना आपल्या डोळ्यातील लॅक्रिमल ग्रंथीला उत्तेजित करत आणि यामुळे डोळे डोळ्यात पाणी येत. कांदा कापताना डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण हे उपाय करून बघू शकता.

कांदा कापताना डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून त्याचे तुकडे करा. त्यांना पाण्यात भिजवा. 2 मिनिटांनी हे तुकडे बारीक बारीक चिरा. कांदा पाण्यात भिजवल्याने त्यामुळे त्रासदायक घटक पाण्यातच विरघळतात. यामुळे डोळ्यांना त्रास होत नाही.

कांदा कापण्यापूर्वी अर्धा तास तो फ्रिजरमध्ये ठेवला तर त्याचा चुरचुरीतपणा कमी होतो. आणि असा कांदा कापताना डोळ्यात पाणी येत नाही.

कांदा कापताना आपण च्युईंग गम चघळू शकता.  च्युईंग गम चघळल्याने डोळ्यातून पाणी येत नाही. ज्या ठिकाणी कांदा कापणार असाल त्या ठिकाणी मेणबत्ती किंवा लँप लावा. यामुळे कांद्यातून निघणारा गॅस मेणबत्ती किंवा लँपच्या दिशेने जाईल आणि डोळ्यातून पाणीही येणार नाही.

कांद्याचा वरचा पापुद्रा हळुवार काढा, आपल्या डोक्यावर ठेवा आणि त्याच स्थितीत कांदा कापा. असे केल्याने सुद्धा डोळ्यातून पाणी येण्याचे प्रमाण कमी होते. कांदा सोलताना तो पाण्याखाली धरावा. यामुळे कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येत नाही. पण कांद्याची चव थोडी कमी होते.

कांदा कापल्यानंतर तो काही वेळाने जेवणात वापरायचा असेल तर छोटय़ा बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात तो ठेवा. म्हणजे चव बिघडणार नाही आणि वास टिकून राहील. कांदा कापताना केव्हाही पंखा बंद ठेवा, डोळ्याला कांदा झोंबणार नाही.

मजेदार गोष्ट म्हणजे कांदा कापण्यासाठी वेगळा गॉगलही मिळतो. जे खास कांदा कापताना घालण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहेत.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रियल सिम्पल आणि हेल्थसाईट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *