- आरोग्य

प्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच अजूनही आहेत किवी फळाचे आरोग्यदायी फायदे

भारतात हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, सिक्किम, मेघालय, निलगिरी पर्वत रांगांच्या प्रदेशात किवी ह्या फळाचे उत्पादन घेतले जाते. किवीचा आकार साधारण कोंबडीच्या अंडया एवढा असतो, दिसायला तपकिरी रंगाचे असलेले हे फळ आतून हिरव्या रंगाचे असते.

किवी फळ दिसायला जवळपास चिकूसारखे असते मात्र याची चव थोडीशी आंबट, तुरट लागते. तसेच याचे आरोग्यासाठी अनेक गुणकारी फायदे असतात. आज जाणून घेऊयात किवीचे आरोग्यदायी फायदे

किवीमध्ये नैसर्गिकरीत्या रक्त पातळ कमी करण्याचे गुणधर्म असल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असलेल्या, तसेच हृदयविकार असणाऱ्यांसाठी हे फळ उपयुक्त आहे.

किवीमध्ये शरीराकरता लागणारे लाभदायक फायबर भरपुर प्रमाणात असतात. ज्यामुळे किवी हे फळ पचायला हलके असते.

किवी फळामध्ये ‘व्हिटामिन सी’ मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे किवी फळाचे सेवन केल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते. किवी फळाचा आतला भाग जितका गुणकारी आहे तितकेच त्याचे सालसुद्धा गुणकारी असते.

किवी फळ डायबिटीजच्या रुग्णांसाठी उपयुक्त मानले जाते. किवीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत मिळते. किवीमधील पोषक तत्वे डिप्रेशन दूर करण्यास मदत करतात.

किवीमध्ये नैसर्गिकरीत्या ‘व्हिटॅमिन सी’चे प्रमाण अधिक असल्याने अनेक रोगांपासून आपला बचाव करण्यास मदत मिळते. किवी फळामध्ये पाणी व पोटॅशियम अधिक असल्याने लघवीच्या जागेवर खाज येत असल्यास किंवा जळजळ होत असल्यास किवी खाल्ल्याने आराम मिळतो.

किवी फळ खाल्ल्याने आपण निरोगी राहू शकता. किवी फळाचे सेवन केल्याने त्वचेवरील डाग देखील नाहीसे होण्यास मदत मिळते.

किवीचे सेवन आपल्या त्वचेसाठी ही फायदेशीर आहे. किवी फळामध्ये व्हिटॅमिन-सी असते, जे शरीरासाठी अत्यावश्यक अँटीऑक्सिडेंट आहे.

सूर्याच्या हानिकारक किरण आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानीपासून त्वचेचे संरक्षण करण्यास ह्या अँटीऑक्सिडेंटची मदत मिळते. किवी फळ खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत मिळते. तसेच दिवसभरातील थकवा दूर होतो.

किवीमध्ये नैसर्गिकरित्या रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असलेल्यांसाठी हे फळ उपयुक्त आहे. रात्री झोपण्याआधी एक तासापूर्वी किवी फळांचा सेवन केल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.

आपल्याला किवी फळाचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *