ताणतणाव, अती झोप घेण्याची सवय, अयोग्य आहार घेण्याची सवय डोळे, तोंड आणि मान यांच्यावर बारीक रेषा तयार होतात. यालाच सुरकुत्या म्हणतात. वयानुसार, त्वचा आपोआप ओलसर आणि लवचिक होते.
त्वचेतील इलेस्टिन आणि कोलेजेन तंतु कमी झाल्यामुळे सुरकुत्या दिसू लागतात. आज आपण चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी सोप्या घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत.
चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी रात्री झोपण्याआधी हातावर थोडे खोबऱ्याचे तेल घ्या. चेहऱ्यावर ज्या ठिकाणी सुरकुत्या पडल्या आहेत त्याठिकाणी खोबऱ्याचे तेल लावा. एक महिना सतत असे केल्याने आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या हि कमी होतील.
चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी कोरफडाचा गर आणि अंड्याचा पांढरा भाग एकत्र करून त्याचा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. अंड्यामध्ये आणि कोरफडाच्या गरामध्ये व्हिटॅमिन ई असते ज्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होण्यास मदत मिळेल.
चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी पिकलेल्या पपईचा गर आणि केळी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी सुरकुत्या आल्या आहेत त्या ठिकाणी लावा.
15 मिनीटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ करा. पपईमध्ये चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्याचे गुणधर्म असतात.हे मिश्रण लावल्याने त्वचा खेचली जाऊन तुम्ही पुन्हा तरुण दिसू लागता.
आहारात व्हिटॅमिन ए, सी आणि ई असलेल्या गोष्टींचा समावेश करा. असे केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येणार नाहीत. दिवसभरात 3/ 4 लिटर पाणी प्या. कारण पाण्यामुळे आपली त्वचा हायड्रेट राहील. ओलाव्यामुळे त्वचा सैल पडणार नाही आणि चेहऱ्यावर सुरकुत्यादेखील येणार नाहीत.
सकाळी शारीरिक कसरतीचा व्यायाम करायची सवय लावा. व्यायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारेल आणि त्वचेला ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा होईल.
आपल्याला चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: टाईम्स नाऊ न्यूज