तजेलदार चेहरा हा सर्वांना आवडतो. अपुऱ्या पोषणामुळे, वातावरणातील धूळ, प्रदूषणामुळे, चेहऱ्यावरील तजेलदारपणा निघून जातो. अति मसालेदार किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील तेज कमी होते.
त्यामुळे खाण्यापिण्याकडे लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे आहे. निरोगी त्वचेसाठी शांत झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी झोपेची वेळ सांभाळा. आज आपण चेहरा तजेलदार होण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय पाहणार आहोत.
चेहऱ्यावर तेज येण्यासाठी पाण्याची वाफ घेणे गरजेचे आहे. पाण्याची वाफ घेतल्यामुळे त्वचेमधील छिद्र मोकळी होतात. कोणताही फेसपॅक अथवा मलम लावण्याआधी पाण्याची वाफ घ्या. त्यामुळे त्वचा तजेलदार होईल. आठवड्यातून एकदा पाण्याची वाफ घेणे फायद्याचे आहे.
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येतात. स्ट्रॉबेरी हाताने बारीक करून चेहऱ्यावर लावल्यास, चेहरा उजळ होईल.
एक चमचा मधामध्ये एक चमचा पाणी मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. असे केल्याने तजेलदार होईल.
त्वचेच्या आरोग्यासाठी योग्य आहार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. अ, इ, जीवनसत्त्वे असलेल्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. दूध आणि दुग्धजन्य उत्पादने, अंडी, मासे, हिरव्या पालेभाज्या यामुळे त्वचा चांगली राहते. त्वचा तजेलदार दिसण्यासाठी योग्य आहार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
चेहरा तजेलदार दिसण्यासाठी पिकलेली केळी हाताने बारीक करून एका वाटीमध्ये घ्या. त्यानंतर त्यामध्ये मध मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर 10 मिनिट लावून ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने चेहरा उजळ होईल.
चेहऱ्यावर तेज दिसण्यासाठी व्यायाम करणे, सकाळच्या वातावरणामध्ये फिरणे महत्त्वाचे आहे. यामुळे शरीर फिट राहून सौंदर्यामध्ये भर पडते. कमीत कमी सहा ते सात तास झोप घेतल्याने चेहऱ्याचे आरोग्य सुधारते.
बेसन पिठामध्ये अर्धा चमचा हळद घालून त्यामध्ये गुलाब जल आणि लिंबू टाकून ही पेस्ट त्वचेवर लावली तर तुमच्यावर एक वेगळ्या प्रकारची चमक येईल. डोळ्याखाली आलेले काळी वर्तुळे निघून जाण्यासाठी ही पेस्ट उपयुक्त आहे.
जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यावे. दररोज कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्या, कारण पर्याप्त प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचा स्वस्थ, चमकदार होते. जास्त पाणी प्यायल्यास कमी वयात त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.
आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.
आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. Food NDTV