- आरोग्य

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय

धावपळीच्या जीवनपद्धतीमुळे ताण-तणाव, पुरेशी झोप न घेणे, अवेळी जेवणं अश्या गोष्टी आपण सगळेच करत असतो पण या गोष्टींचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागतात.

आपली रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते. यामुळे आपल्याला छोटे मोठे आजार व्हायला लागतात. आज आपण जाणुन घेणार आहोत. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय.

आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी आपल्याला आजारांपासुन वाचविण्याचे कार्य करत असतात, जेव्हा रक्तामध्ये पांढऱ्या रक्त पेशींची कमतरता येते तेव्हा आपली रोग प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते.

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दोन चमचे तीळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. नंतर पाणी गाळून तिळाची पेस्ट करुन घ्या. यामध्ये मध मिसळून दिवसातुन दोन वेळेस हे मिश्रण खावे. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते. आणि प्रतिकार शक्ती वाढते.

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लिंबू वर्गीय म्हणजेच संत्री, मोसंबी फळ खा. लिंबू वर्गीय फळामध्ये मोठ्या प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते.

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण 5 ते 10 भिजवलेल्या  बदामाचा आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये  समावेश करू शकता. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी टॉमेटो खा. टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते.

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दालचीनी अत्यंत उपयुक्त आहे. दालचीनीमध्ये ऍन्टी-ऑक्सिडेंट्स आणि ऍन्टी-बॅक्टिरीअल गुण असतात. जे शरीरासाठी उपयुक्त ठरतात.

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नियमितपने आवळ्याचा आपल्या आहारात समावेश करा यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते.

रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी शरीराला अँटिऑक्सिडंटची आवश्यकता असते. कलिंगडामध्ये ग्लुटॅथिओन हा अँटिऑक्सिडंटमधील घटक असतो. या घटकामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रात्री एक कप हळदीचे दूध पिल्यास रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते.

आपले शरीर झोपेमध्ये शरिराला पुरक अशा काही हार्मोन्सची निर्मिती करत असते. झोपेच्या चक्रात बिघाड झाल्यास त्याचा परिणाम आपोआपच शरिराच्या रोगप्रतिकारशक्तीवर होतो. सात तासांपेक्षा कमी वेळ झोप घेतल्यास शरीर त्याला सक्षमपणे प्रतिकार करू शकत नसते. निरोगी आरोग्यासाठी किमान ७-९ तास झोप आवश्यक असते.

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काळी मिरीदेखील अत्यंत उपयुक्त आहे. काळी मिरी चांगल्याप्रकारचे अँटी-ऑक्सिडंट आहे. ज्यामुळे सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते.

नियमित व्यायाम केल्याने शरिरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो, आणि रोगप्रतिकारक पेशीचा संचार वाढतो. तसेच व्यायाम केल्याने मन प्रसन्न राहते व चांगली झोप मिळते.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. Health-Line

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *