- आरोग्य

अचानक चक्कर आल्यावर काय करावे?

मानसिक ताणतणाव, झोप न येणे, जेवणाकडे दुर्लक्ष करणे या अनेक कारणांमुळे चक्कर येते. मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठयामध्ये अडथळा आल्यास चक्कर येते. यास भोवळ येणे असेही म्हणतात.

एका जागी बसून राहिल्यास अचानक उठताना एकदम गरगरते आणि चक्कर येते. चक्कर आल्यास नेमके आपण काय केले पाहिजे हे आपल्याला माहित नसते म्हणूनच हि माहिती आपण वाचली पाहिजे

ज्यांना वारंवार चक्कर येते अशांनी चहा आणि कॉफीचे प्रमाण कमी ठेवावे. नारळ पाणी प्यावे. नारळ पाणी पिल्याने एनर्जी येते आणि आपल्याला चक्कर येत नाही. नारळ पाणी पिणे हे अशक्त असलेल्या व्यक्तींसाठी अतिशय लाभकारक आहे. त्यामुळे चक्कर येणाऱ्या व्यक्तींनी नारळ पाणी प्यावे.

चक्कर येण्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी तुळशीच्या पानांच्या रसामध्ये साखर मिसळून हे मिश्रण घ्यावे. तुळशीच्या पानांमध्ये मध मिसळून घेतल्याने ही चक्कर येणे बंद होते.

उन्हामध्ये फिरताना चक्कर येण्याचा त्रास तुम्हाला असेल तर तुम्ही तुमच्या जवळ ग्लुकोज पावडर मिश्रित पाणी सोबत ठेवा. एका सलाईन इतकी ताकद त्या पावडर मध्ये असते. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ताकद येईल.

चक्कर येणे या समस्येवर सर्वात रामबाण उपाय म्हणजे लिंबूपाणी. लिंबू पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकून हे मिश्रण घेतल्यास चक्कर येण्याची समस्या थांबेल. ज्यांना वारंवार चक्कर येते अशांना पूर्वीपासूनच लिंबू पाणी दिले जाते.

फळांचा ज्यूस पिणे हा या समस्येवर एक चांगला उपाय आहे. प्रवासात डीहायड्रेशनचा त्रास होत असेल आणि त्यामुळे चक्कर येत असेल तर फळांचा रस घ्या. त्यामुळे चक्कर येण्याची समस्या दूर होईल.

ज्यांना सारखी सारखी चक्कर येण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी. नियमित जेवण वेळेवर करा उपाशी राहिल्याने सुद्धा चक्कर येऊ शकते.

नियमित पुरेसे पाणी प्या. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने सुद्धा चक्कर येऊ शकते. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असू द्या.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. Health Site & WebMd

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *