- आरोग्य

चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्याचे घरगुती उपाय

हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलामुळे, तेलकट त्वचेमुळे, हवेतील धूळ आणि प्रदूषणामुळे, तेलकट मसालेदार पदार्थांचा आहारात असलेला समावेश, मानसिक ताणतणाव या गोष्टीमुळे आपल्या चेहऱ्यावर मुरूम येत असतात. आज आपण जाणून घेणार आहोत, चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्याचे घरगुती उपाय

चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यासाठी 2 चमचे मधामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावरच्या मुरुमाच्या डागांवर लावा. 20 मिनिटे हा थर चेहऱ्यावर राहूद्या त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. असे केल्याने चेहऱ्यावरील मुरूमाचे डाग निघून जाण्यास मदत मिळेल.

चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यासाठी एका वाटीमध्ये थोडीशी मुलतानी माती घ्या त्यामध्ये 2 चमचे गुलाब जल मिसळून ते आपल्या चेहऱ्यावर लावा. 15 मिनिट राहूद्या त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. असे केल्याने चेहऱ्यावरील मुरूम कमी होतील.

चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट बनवून आपल्या चेहऱ्यावर लावा. काही वेळ राहूद्या त्यानंतर पाण्याने चेहरा धुऊन टाका. असे केल्याने चेहऱ्यावरील मुरूम कमी होतात. तसेच गुलाबाच्या पाकळ्यांचा लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहरा ताजातवाना दिसू लागेल.

चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यासाठी आपण कोरफड गराचा उपयोग करू शकता. यासाठी थोडासा कोरफड गर हातावर घेऊन आपल्या चेहऱ्यावर लावा. साधारणपणे 15 मिनिटे राहूद्या त्यानंतर पाण्याने चेहरा धुऊन टाका. नियमित असे केल्याने आपल्याला फरक दिसेल.

चेहऱ्यावरील मुरूम कायमचे घालवण्यासाठी आपण आपल्या आहारात, जीवनशैलीमध्ये बदल करणे गरजेचे आहे. दिवसभरात कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी प्यायची सवय लावा. नियमित सहा ते सात झोप घ्या, आहारात तेलकट, मसालेदार, फास्टफूडचा समावेश करू नका.

आहारात ताज्या पालेभाज्या, फळांचा समावेश करा, चेहऱ्यावर केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनाचा वापर करू नका, आहारामध्ये व्हिटामिन ई युक्त पदार्थांचा समावेश करा.

दिवसातून 2 वेळा चेहरा पाण्याने धुऊन घेण्याची सवय लावा. असे केल्याने चेहऱ्यावरील  घाण आणि धूळ निघून जाईल आणि आपला चेहरा तेलकट होणार नाही. आणि चेहऱ्यावर मुरूम येणार नाही.

आपल्याला चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्याचे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. R: News Room Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *