- आरोग्य

मुळव्याध प्राथमिक लक्षणे आणि घरगुती उपाय

अवघड जागचे दुखणे म्हणून मुळव्याधीचा त्रास असल्यास बऱ्याचदा त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. परंतु मुळव्याधीमुळे आपली रोजची काम करणं जमिनीवर बसणं कठीण जाऊ लागतं तेव्हा यावर उपचार शोधायला लागतो.

तोपर्यंत मुळव्याधीची समस्या वाढलेली असते. म्हणूनच मुळव्याधीचा त्रास होत असल्यास न लाजता प्राथमिक अवस्थेत असताना आपण त्याची विशेष काळजी घेतली आणि आहारात काही बदल केले तर आपण मुळव्याधीच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. आज आपण मुळव्याधीची प्राथमिक लक्षणे आणि काही घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत.

मुळव्याध ह्या आजाराच्या सुरुवातीला शौचास बसल्यावर त्रास होतो. तसेच शौच बाहेर पडताना वेदना आणि रक्त येते. बऱ्याचदा गुदद्वाराजवळ खाज हि येऊ शकते. आपल्याला बसण्यास त्रास होऊ शकतो. हि झाली प्राथमिक लक्षणे.

मुळव्याध गंभीर स्वरुपाची नसल्यास किंवा सुरुवातीच्या टप्प्यात असल्यास  आपण काही घरगुती उपाय आणि आहारात बदल करून मुळव्याधीपासून सुटका मिळवू शकता.

आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी शरीराला पुरेश्या पाण्याची गरज असते. पाणी भरपूर प्यायल्याने  शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत होतात. अपचन होत नाही. तसेच शरीरातील मलनिस्सारनाचे कार्य सुरळीत पार पडते. म्हणून मुळव्याधीचा त्रास होऊ नये यासाठी आपण पुरेसे पाणी प्यायले पाहिजे.

बीट, गाजर,काकडी, मुळा यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. फायबरयुक्त आहार घेतल्याने  मलावरोध कमी होतो. त्यामुळे बीट, गाजर,काकडी, मुळा यांच्या सॅलेड चा आपल्या आहारात समावेश करा.

आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या जसे कि पालक, कोबी, शेपू, चाकवत, यांचा समावेश करा. तसेच नियमित एक तरी फळ खाण्याची सवय स्वताला लावा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. फायबरयुक्त आहार घेतल्याने  मलावरोध कमी होतो.

अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यासाठी ताक पिण्याची सवय लावा. नियमित ताक प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही. आणि मलनिस्सारनाचे कार्य सुरळीत पार पडते.

शौच बाहेर पडताना वेदना होत असल्यास त्यावर कोरफडाचा गर लावल्याने वेदना कमी होण्यास मदत मिळते. पचनास जड असणारे पदार्थ खाणे टाळावे तसेच अती तिखट मसालेदार पदार्थ खाणे, मैदा युक्त पदार्थ हि टाळावे. यामुळे मलनिस्सारनास त्रास होऊ शकतो.

आपल्याला मुळव्याध प्राथमिक लक्षणे आणि घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. REF: HealthLine

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *