- आरोग्य

केसांची झटपट वाढ होण्यासाठी सोपे घरगुती उपाय

आपले केस लांब आणि सुंदर असावे असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. केसांची लांबी वाढण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे शाम्पू आणि तेल वापरून पहिले असतील. केसांची लांबी वाढण्यासाठी त्यांची काळजी घेणे देखील आवश्यक असते. आज आपण आपले केस वाढवण्यासाठी सोप्या घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत.

केस वाढवण्यासाठी आपण कांद्याच्या रसाचा वापर करू शकता. कांद्याच्या रसामध्ये असलेल्या सल्फरमुळे केसांच्या वाढीला मदत मिळते. यासाठी 1 लाल कांदा घ्या. त्याचे 4 तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करा. पातळ रुमालाच्या मदतीने त्यामधील ज्युस गाळून घ्या.

कापसाच्या सहाय्याने अतिशय काळजीपूर्वक कांद्याचा रस केसांच्या मुळाना लावा. साधारण 15 मिनिट्स लावून ठेवा त्यानंतर केस धुऊन टाका. लक्षात असुद्या कांद्याचा रस आपल्याला केसाच्या मुळावर लावायचा आहे. हा रस केसांवर थापू नका.

कोरफडाच्या गरामध्ये केसांसाठी आवश्यक अनेक पोषक तत्व असतात ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. आणि केस मजबूत हि होतात. यासाठी आपल्याला कोरफडीचा गर आपल्या केसांच्या मुळावर लावायचा आहे. साधारण 15 ते 20 मिनिटे लावून ठेवा त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.

केसांच्या वाढीसाठी अंड्याच्या पांढऱ्या बलकाचा हि वापर आपण करू शकता. यासाठी एक अंडे घ्या. ते फोडून त्यातील पांढरे बलक वेगळे करा त्यात थोडेसे मध मिसळून चांगले मिक्स करून घ्या. हे मिश्रण केसांच्या मुळांवर लावा.

साधारणपणे 20 मिनिटे राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुऊन टाका. असे केल्याने आपले केस जलद वाढू लागतील. त्याच बरोबर केस चमकदार आणि मजबूत हि होतील.

केसांच्या वाढीसाठी आवळा खूप फायदेशीर आहे. आवळयामध्ये पुष्कळ पोषक तत्त्वे असल्यामुळे केसांच्या वाढीस मदत होते. यासाठी थोडेसे आवळे मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. त्याचा रस वस्त्रगाळ पद्धतीने वेगळा करा.

हा रस केसांच्या मुळाना लावा. साधारणपणे 15 मिनिटे लावून ठेवा त्यानंतर केस धुऊन टाका. आठवड्यातून एकदा आवळ्याचा रस केसांच्या मुळावर लावल्याने केस जलद वाढतात.

केसांच्या वाढीसाठी आणि केसांना मजबुती आणायची असल्यास तुम्ही नियमित म्हणजे आठवड्यातून दोन वेळा तरी शिकेकाईचा वापर करा. त्यामुळे तुमच्या केसांना मजबूती येईल.

रात्री मेथीचे दाणे भिजवून सकाळी मिक्सरमध्ये बारीक करून एका वाटीत काढून घ्या त्यात थोडेसे दही मिसळा आणि केसांच्या मुळावर लावा. 15 मिनिटे राहू द्या त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.

आठवड्यातून किमान दोनदा असे करा. असे केल्याने आपले केस झटपट वाढतील. रात्री झोपण्याआधी  केसांना कोमट करून बदामचे तेल लावल्याने हि केसांची वाढ जलदगतीने होते.

बऱ्याचदा केसांच्या वेगवेगळ्या स्टाईल्स करण्यासाठी त्यावर जेलचा वापर करत असतो. त्यामुळे केसगळतीमध्ये वाढ होते. त्यामुळे अशा जेल पासून लांबच राहणे आपल्या फायद्याचे राहील.

आपल्याला केसांची झटपट वाढ होण्यासाठी सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: हेल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *